दात घासताना जीभही करा स्वच्छ; अन्यथा शरीराचं होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 10:03 AM2020-04-29T10:03:35+5:302020-04-29T10:04:44+5:30
जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर हेच बॅक्टेरिया पुढे दात किडन्याचं कारण ठरू शकतात.
आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांपासून स्वतःला लांब ठेवायचं असेल बारिकसारिक गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही आपले दात स्वच्छ करता तेव्हा जीभेची स्वच्छता करणं सुद्धा करायला हवी. ओरल हेल्थचा विचार करत असताना तुम्ही दररोज दातांसोबतच आपली जीभसुद्धा चांगली ठेवायला हवी. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही फक्त ब्रशच्या मागच्या बाजूच्या स्क्रॅपरचा वापर करून तुम्ही आपली जीभ चांगली ठेवू शकता.
आज आम्ही तुम्हाला जीभ स्वच्छ ठेवणं का गरजेंच आहे. याबाबत सांगणार आहोत. ब्रश केल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्नकण निघून जातात आणि दात साफ होतात. पण तरीही तोंडात काही बॅक्टेरिया असतात. जे जीभेवर तसेच राहतात. जर तुम्ही जीभ स्वच्छ करत नसाल तर हेच बॅक्टेरिया पुढे दात किडन्याचं कारण ठरू शकतात.
श्वासांची दुर्गंधी
अस्वच्छ जीभेवर अनेक बॅक्टेरीया असतात. त्यामुळे जीभ पांढरी किंवा पिवळी झाल्याप्रमाणे दिसते. जीभेवरचे हे बॅक्टेरिया संपूर्ण दिवसभर दुर्गंधी आणि खराब श्वासांचे कारण ठरू शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही जीभेची घासून स्वच्छ करता तेव्हा डेड स्किन आणि बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते.
चव समजणं
साधारणपणे सतत जीभ स्वच्छ न करता खाल्यामुळे सतत जीभेवर थर तयार होतो. त्यामुळे तुम्हाला पदार्थांची चव व्यवस्थित कळत नाही. टेस्ट सेंस कमी होण्याची शक्यता असते. जर तुम्ही जीभेची चांगली स्वच्छता केली तर तुम्हाला गोड, तिखट, आंबट या चवींमधला फरक चांगला जाणवेल. तसंच एखादा पदार्थ तुम्ही चवीचा आनंद घेऊन खाऊ शकता. ( हे पण वाचा-तुम्ही इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड खाताय का?; असा ओळखा फरक)
पचनक्रियेत सुधारणा
जीभ पचनक्रियेशी सुद्धा जोडलेली असते. त्यामुळे जर तुम्ही नियमीत जीभ साफ कराल तर बॅक्टेरियांचा प्रवेश शरीरात होणार नाही. अन्यथा पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून आजारांपासून लांब राहण्यासाठी दातांप्रमाणेच जीभेची स्वच्छ करणं तितकंच महत्वाचं आहे. ( हे पण वाचा-'या' औषधाने फक्त २ दिवसात मरेल कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा दावा)