Coronavirus : कोरोना रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर, अद्याप सावधगिरी बाळगण्याची गरज - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:04 PM2021-09-30T19:04:07+5:302021-09-30T19:06:36+5:30

Coronavirus : देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत.

recovery rate reached 98 percent in the country health ministry said still need to be cautious | Coronavirus : कोरोना रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर, अद्याप सावधगिरी बाळगण्याची गरज - आरोग्य मंत्रालय

Coronavirus : कोरोना रिकव्हरी रेट 98 टक्क्यांवर, अद्याप सावधगिरी बाळगण्याची गरज - आरोग्य मंत्रालय

Next

नवी दिल्ली : देशात 18 जिल्हे आहेत, जेथे कोरोना व्हायरसचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10 टक्के आहे, असे केंद्र सरकारने गुरुवारी म्हटले आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत परंतु केरळमध्ये अजूनही जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली जात आहेत. (recovery rate reached 98 percent in the country health ministry said still need to be cautious)

राजेश भूषण म्हणाले की, देशभरात कोरोना व्हायरसच्या सक्रिय रुग्णांच्या (Coronavirus Active Cases in India) संख्येत घट होत आहे, त्यासोबतच बरे होण्याचे प्रमाणही सतत वाढत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहोचले आहे. याशिवाय, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10 टक्के आहे.




याचबरोबर, सणासुदीचा हंगाम येत आहे. आम्ही सर्वांना गर्दीपासून दूर राहण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करतो, असे राजेश भूषण म्हणाले. तसेच, कोविडच्या अनुकूल व्यवहाराचे पालन करून लोकांनी सण साजरा करावा, असे निर्देश सुद्धा यावेळी राजेश भूषण यांनी दिले आहेत.


राज्यात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे
केंद्रीय सचिव म्हणाले की, केरळमध्ये सर्वाधिक 144,000 सक्रिय प्रकरणे आहेत, जी देशातील एकूण सक्रिय प्रकरणांच्या 52 टक्के आहेत. महाराष्ट्रात 40,000 सक्रिय प्रकरणे आहेत. तामिळनाडूमध्ये 17,000 सक्रिय प्रकरणे आहेत, मिझोराममध्ये 16,800 सक्रिय प्रकरणे आहेत, कर्नाटकात 12,000 आणि आंध्र प्रदेशात 11,000 पेक्षा थोडी अधिक आहेत.


दरम्यान, अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला आणि कमीतकमी या वर्षी येणारे उत्सव थोडा संयमाने साजरे करा, असे आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले. तसेच, डेंग्यूची लस हा महत्त्वाचा अजेंडा आहे. देशात डेंग्यूचे अनेक प्रकार आहेत, त्यासाठी भारतातील काही कंपन्यांमध्ये परवाने देण्यात आले आहेत. अनेक कंपन्यांनी इतर देशांमध्ये चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही अनेक महत्त्वाच्या चाचण्या घेण्याचा विचार करत आहोत, असे डॉ. बलराम भार्गव म्हणाले.



 

Web Title: recovery rate reached 98 percent in the country health ministry said still need to be cautious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.