लाल केळी आरोग्यासाठी फायदेशिर !

By admin | Published: October 29, 2016 01:09 AM2016-10-29T01:09:57+5:302016-10-29T01:09:57+5:30

आपणास फक्त पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या केळी माहित आहेत, पण लाल रंगाच्या केळी देखील उपलब्ध असून त्या चविला सारख्याच आहेत. मात्र ‘ा केळी इतर केळींपेक्षा जास्त पौष्टिक असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. लाल केळीपासून शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया...

Red banana is beneficial for health | लाल केळी आरोग्यासाठी फायदेशिर !

लाल केळी आरोग्यासाठी फायदेशिर !

Next
णास फक्त पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या केळी माहित आहेत, पण लाल रंगाच्या केळी देखील उपलब्ध असून त्या चविला सारख्याच आहेत. मात्र ‘ा केळी इतर केळींपेक्षा जास्त पौष्टिक असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. लाल केळीपासून शरीराला होणारे फायदे जाणून घेऊया...
फायबरचे जास्त प्रमाण
आपली पचनसंस्था चांगली राहावी म्हणून फायबर आवश्यक असते. तसेच गॅसेस, अपचन व जुलाब आदी समस्यांवरदेखील फायबर उपयुक्त ठरते. लाल केळीत फायबर असल्याने वरील समस्यांवर रामबाण उपाय ठरतो.

किडनीसाठी फायदेशिर
लाल केळीत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असल्याने ते किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशिर आहे. याच्या सेवनाने कि डनी स्टोन, हृदयविकार व कर्करोगाच्या समस्या उद्भवत नाहीत. यात कॅल्शियमचेही प्रमाण जास्त असल्याने लहानांपासून मोठ्यांपयंर्त सर्वांनीच दैनंदिन आहारात या केळीचा समावेश करावा. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

धुम्रपानावर उपाय
धुम्रपानाच्या समस्येवरदेखील लाल केळी उपयुक्त आहे. बर्‍याचदा धुम्रपान सोडताना शरीरावर त्याचे परिणाम होतात, मात्र लाल केळीतील विटॅमिन सी, बी-६, पोटॅशियम व मॅग्नेशियम यामुळे शरीरावर होणारे परिणाम कमी होतात. धुम्रपान अचानक सोडल्यामुळे नैराश्य, आळस किंवा चिडचिड होऊ शकते, मात्र लाल केळीच्या सेवनाने यांचा त्रास कमी होतो.

Web Title: Red banana is beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.