शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' ५ सोप्या एक्सरसाइज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:17 PM2019-05-13T12:17:23+5:302019-05-13T12:20:57+5:30

शरीराचं वजन वाढण्याच्या मुख्य कारणांमध्ये शरीरात जमा झालेली अधिकची चरबी असते.

To reduce fat from the body practice these 5 exercises everyday | शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' ५ सोप्या एक्सरसाइज!

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' ५ सोप्या एक्सरसाइज!

googlenewsNext

शरीराचं वजन वाढण्याच्या मुख्य कारणांमध्ये शरीरात जमा झालेली अधिकची चरबी असते. शरीरात जास्त चरबी झाली की, शरीराचा आकार पूर्णपणे बदलून जातो. तसेच वेगवेगळे आजारही होतात. अशात शरीरातील एक्स्ट्रा फॅट दूर करण्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे एक्सरसाइज ठरतो. चरबी कमी करण्यासाठी अनेक एक्सरसाइज आहेत, पण काही अशाही एक्सरसाइज आहेत ज्यांनी कमी वेळातच चरबी कमी केली जाऊ शकते.  

लो-बेली लेग रीच

ही एक्सरसाइज खासकरून तुमच्या अ‍ॅब्स आणि कोरसेट(पोट आणि मांड्यांच्या मधला भाग) साठी फार फायदेशीर आहे. ही एक्सरसाइज करण्यासाठी सर्वातआधी जमिनीवर सरळ झोपा. हात डोक्यामागे असावे. हाताने डोक्यावर भार देत डोकं आणि कंबर पुढच्या भागात घेऊन जा आणि पाय वर उचला. घुडघे ९० डिग्री अ‍ॅंगलवर ठेवा. या स्थितीत कमीत कमी ३ ते ५ सेकंद थांबा आणि पुन्हा आधीसारखंच करा. 

टीजर

ही एकप्रकारची अ‍ॅडव्हान्स पायलेट्स मुव्ह आहे. ही एक्सरसाइज करण्यासाठी पाठीवर झोपा. पाय वर उचला आणि गुडघे ९० ड्रिगी अ‍ॅंगलमध्ये वाकवा. पोट श्वास न सोडता टाइट करा आणि हात डोक्याच्या बाजूने सरळ करा. आता हळूहळू पाय खाली ठेवा. ही एक्सरसाइज १५ वेळा करा. 

प्लॅंक

प्लॅंक एक्सरसाइजसाठी पोटावर झोपा. आता दोन्ही हातांच्या ढोपराच्या आणि पायांच्या पजांच्या आधारे शरीर वर उचला. आता हात जमिनीवर ठेकवून नमस्कार मुद्रा करा. याच स्थितीत ३० ते ६० सेकंद रहावे. याने पोटावरील चरबी लवकर कमी होईल. 

अ‍ॅडव्हांस लेग क्रंच

या एक्सरसाइजने मांडीवरील आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. ही एक्सरसाइज करण्यासाठी पाठीवर झोपा आणि दोन्ही पायांच्या मधे १ ते ५ किलोचं डम्बल धरा. आता हात जमिनीवर आरामात ठेकवा आणि पाय पोटाकडे ओढावे. नंतर पाय आधीच्या स्थितीत आणा. 

डॉंकी किक बॅक्स

या एक्सरसाइजने केवळ कॅलरी बर्न होतात असे नाही तर अॅब्सही बनतात. याने एक्सरसाइजने चरबीही कमी केली जाते. 

Web Title: To reduce fat from the body practice these 5 exercises everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.