​ असा कमी करा लठ्ठपणा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 05:17 PM2016-12-15T17:17:24+5:302016-12-15T17:17:24+5:30

बलदत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात.

Reduce obesity! | ​ असा कमी करा लठ्ठपणा !

​ असा कमी करा लठ्ठपणा !

Next
दत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात. 
आपल्या दिवसाचे सर्वात महत्त्वाचे भोजन म्हणजे न्याहारी होय. त्यामुळे नियमित न्याहारी करा. मात्र आहारातील कॅलरीजच्या प्रमाणाचेही भान ठेवा. त्यात कमी कॅलरी, कमी साखर तसेच कमी फॅट असलेलाच आहार घ्या. ताजी फळे, भाज्या व धान्यांचा समावेश बरोबरच संतुलित आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.  
कमीत-कमी दिवसातून ३० मिनिटे व्यायाम करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासोबतच लठ्ठपणासंबंधित होणारे आजार टळतात. मधुमेह, ह्रदयरोग यांचा धोका कमी होतो. व्यायामामुळे उच्च रक्तदाब आणि तणाव कमी होण्यासाठी मदत होते. कमरेच्या भोवताली आणि पूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
निद्रानाश असलेले लोक आळस आणि थकल्यामुळे व्यायाम करू शकत नाही. म्हणून पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा, कारण अनियमित झोप आणि निद्रानाश झाल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते. 

Web Title: Reduce obesity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.