लसूण आणि कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 09:33 AM2019-02-23T09:33:38+5:302019-02-23T09:39:12+5:30
वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात.
कांदा आणि लसणाचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असतील. वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासोबतच कांदा आणि लसूण वेगवेगळ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. आता कांदा आणि लसणाचा आणखी एक मोठा फायदा समोर आला आहे. जर तुम्ही डाएटमध्ये पालीचा कांदा, कांदा आणि लसणाचा समावेश रत असाल तर तुमच्यात कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) म्हणजेच मलाशयाचा कर्करोग विकसित होण्याचा धोका कमी राहतो.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. कोलोरेक्टल कर्करोग हा मलाशय आणि गुदद्वाराचा कर्करोग आहे. मलाशय आणि गुदद्वार हे मोठ्या आतड्यांचा भाग आहेत. जो पचन तंत्राचा सर्वात खालचा भाग असतो. ज्या वेगवेगळ्या कॅन्सरमुळे लोकांचा मृत्यू होतो, त्यात महिला आणि पुरूषांच्या प्रकरणात कर्करोगाचं हे क्रमश: दुसरं आणि तिसरं सर्वात मोठं रूप आहे.
एशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये आढळले की, कांदा, लसूण आणि कांद्याची पाल खाल्ल्याने वयस्कांमध्ये कोलरेक्टल कर्करोगाचा धोका ७९ टक्के कमी होतो. चायना मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या फर्स्ट हॉस्पिटलचे झी ली म्हणाले की, आमच्या रिसर्चमधून जे निष्कर्ष समोर आले आहेत, त्यानुसार हे सांगणं चांगलं होईल की, काळजी घेण्यासाठी कांदा आणि लसूण असलेल्या भाज्या खाणे जास्त फायदेशीर आहे.
ते म्हणाले की, या रिसर्चचे निष्कर्ष यावरही प्रकाश टाकतात की, जीवनशैलीमध्ये परिवर्तन करून कशाप्रकारे सुरूवातीलाच कोलोरेक्टल कर्करोगाला रोखलं जाऊ शकतं. या रिसर्चमध्ये ८३३ निरोगी आणि कोलोरेक्टल कर्करोगाने पीडित ८३३ रुग्णांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांच्यावर परिक्षण करून हा निष्कर्ष काढला गेला की, कांदा, लसूण आणि पालीचा कांदा खाल्ल्याने मलाशयाच्या कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो.