वजन कमी करण्यासाठी ट्राय करा खास मसाला चहा, स्लिम आणि फिट रहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:16 PM2019-04-25T12:16:21+5:302019-04-25T12:24:43+5:30
जर तुम्हीही वाढलेल्या वजनामुळे हैराण आहात आणि तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही पारंपारिक आयुर्वेदिक उपाय ट्राय करु शकता.
(Image Credit : OnMyPlate.co.uk)
जर तुम्हीही वाढलेल्या वजनामुळे हैराण आहात आणि तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर तुम्ही पारंपारिक आयुर्वेदिक उपाय ट्राय करु शकता. यात वापरले जाणारे मसाले तुम्हाला वजन कमी करण्यास फायदेशीर ठरु शकतात. त्यासाठी तुम्हाला प्यायचाय फक्त चहा. पण हा चहा सामान्य नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मसाला चहा घ्यावा लागेल. या मसाला चहाच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वाढून तुमच्या शरीरातील जमा फॅट बर्न होईल. आयुर्वेदिक मसाल्यांमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे शरीराचं मेटाबॉलिज्म वाढवतात. त्यामुळे या चहाचे अनेक फायदे आहेत.
जाणून घ्या मसाला चहाचे फायदे
मसाला चहामध्ये असलेल्या मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडेंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून या चहामुळे बचाव होऊ शकतो.
(Image Credit : Medical Xpress)
कसा कराल तयार?
१० लंवग
१५ वेलची
३ काळे मिरे
३ चमचे बडीशेप
१ तुकडा दालचिनी
थोडं आल्याचं पावडर
(Image Credit : Taste of Beirut)
मसाला कसा तयार कराल?
चहाचा मसाला तयार करण्यासाठी आधी लवंग, वेलची, काळे मिरे आणि बडीशेप २ मिनिटांसाठी तव्यावर भाजा. नंतर या दालचिनीचा तुकडा टाकून ३० ते ४० सेकंद भाजून घ्या. मसाला थंड झाल्यानंतर त्यात आल्याचं पावडर मिश्रित करा. आता हे सर्वच मसाले मिक्सरमधून बारीक करा. तुमचा मसाला तयार आहे. हा मसाला एखाद्या एअर टाइट डब्यात भरुन ठेवा.
(Image Credit : Momspresso)
चहा कसा कराल?
मसाला चहा तयार करण्यासाठी आधी सामान्यपणे आपण नेहमी करतो तसा चहा बनवा. चहा गाळून घेतल्यानंतर त्या अर्धा चमचा मसाला पावडर टाका. तुम्हाला हवं असेल तर चहा तयार करतानाही तुम्ही त्यात हा मसाला टाकू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर चहात दूध आणि साखर टाकू नका. त्याऐवजी १ चमचा मध आणि अर्धा चमचा मसाला टाका.
कसा होतो फायदा?
- दालचिनी आयुर्वेदात फार गुणकारी मसाला मानला जातो. याने शरीरातील ग्लूकोजचं प्रमाण नियंत्रित होतं आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.
- लवंग शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि ग्लूकोज लेव्हल कंट्रोल करण्यासाठी ओळखली जाते.
- काळे मिरे जगभरात वजन कमी करण्यासाठी फार पूर्वीपासून वापरले जातात. यातील पिपरीन नावाचं तत्त्व तुमचं मेटाबॉलिज्म वाढवतं आणि याने जमा झालेली चरबी कमी करण्यास मदत मिळते.
- बडीशेप पोटासाठी फार चांगली मानली जाते. याने शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकले जातात आणि पचनक्रियाही चांगली होते.
- वेलचीमध्ये असे तत्व असतात जे वजन कमी करतात. वेलची तोंडाची दुर्गंधी दूर करते आणि पचनक्रिया चांगली करते. यात मेलाटोनिन नावाचं तत्त्व असतं ज्याने फॅट बर्न होतं.