उन्हाळ्यात कमी करायचंय वजन?; लस्सीमध्ये 'या' पदार्थांचा समावेश करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:29 PM2019-05-18T12:29:14+5:302019-05-18T12:29:57+5:30
वजन कमी करणाऱ्यांसाठी उन्हाळा अगदी फायदेशीर समजला जातो. या वातावरणामध्ये दिवस मोठा असून सुर्योदय लवकर होत असून संध्याकाळी उशिरा मावळतो. त्यामुळे तुम्ही जिम आणि वर्कआउट करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता.
वजन कमी करणाऱ्यांसाठी उन्हाळा अगदी फायदेशीर समजला जातो. या वातावरणामध्ये दिवस मोठा असून सुर्योदय लवकर होत असून संध्याकाळी उशिरा मावळतो. त्यामुळे तुम्ही जिम आणि वर्कआउट करण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडू शकता. तसेच उन्हाळ्यामध्ये आपण जास्त वॉटर इन्टेक जास्त घेतो. त्यामुळे फॅट बर्न होण्यासाठी मदत होते. यादरम्यान हेल्दी ड्रिंक्सचही सेवन मोठ्या प्रमाणात करण्यात येतं. असचं एक पारंपारिक हेल्दी ड्रिंक आहे ते म्हणजे, लस्सी. पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली लस्सी वजन कमी करण्यासाठीही मदत करते. पण फक्त लस्सी पिण्यापेक्षा जर लस्सीमध्ये काही खास पदार्थ एकत्र करून प्यायल्याने फायदा होतो. जाणून घेऊया कोणते खास पदार्थ एकत्र करून पिणं खास ठरतात त्याबाबत...
सर्वांना आवडते लस्सी
दह्यापासून तयार करण्यात आलेली लस्सी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. लस्सी प्यायल्याने कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फरस यांसारखी पोषक तत्व शरीराला मिळतात. लस्सीचे सेवन केल्याने उन्हाळ्यातही आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. अनेक ठिकाणी गोड तर काही ठिकाणी नमकीन लस्सी पिण्यात येते. उन्हाळ्यात लस्सीची मागणी फार वाढते. तसेच यामध्ये असणारी पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. दही आणि पाण्यासोबतच जीरं, काळं मीठ, पुदिना, हिरवी मिरची, हिंग आणि पुदिना यांसारख्या मसाल्यांनी तयार करण्यात आलेली लस्सी औषधी समजली जाते.
पोटासाठी खास ठरते लस्सी
पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी दही एकमेव उपाय समजला जातो. बद्धकोष्ट, पोट फुगणं यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी लस्सी उत्तम पर्याय ठरतो. परंतु जर यामध्ये काही दुसरे पदार्थ एकत्र करण्यात आले तर ही वजन कमी करण्यासाठी मदत करते.
केळी
एक कप दह्यामध्ये 1 ते 2 केळी एकत्र करून स्मूदी तयार करा. याचे दररोज सकाळी सेवन केल्याने अगदी वेगाने वजन कमी होतं. ज्या लोकांना छातीत जळजळ, अपचन आणि पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.
काळं मीठ आणि काळी मिरी
लस्सी किंवा ताकामधये साखर, काळी मिरी पावडर आणि काळं मीठ एकत्र करून दररोज प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या दूर होते. तसेच याच्या सवनाने पोट बराचवेळ भरल्याप्रमाणे वाटते, भूक लागत नाही, अपचन आणि पोटाची जळजळ दूर होते.
ओवा
ज्या लोकांना पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यांनी लस्सी किंवा ताकामध्ये ओवा एकत्र करून पिणं फायदेशीर ठरतं. त्यासाठी एक ग्लास लस्सी आणि ताकामध्ये एक छोटा चमचा ओव्याची पावडर एकत्र करून प्या. एक कप लस्सी दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायल्याने कावीळ दूर राहण्यास मदत होते.
पुदिना
ज्या लोकांना अपचनाच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यांनी पुदिना घातलेल्या ताकाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. ताक यूरिन इन्फेक्शन कमी करतं. याव्यतिरिक्त तहान लागणं आणि त्वचेसंदर्भातील आजारांमध्ये ताक पिणं उत्तम ठरतं.
टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.