तासंतास मोबाइलवर स्क्रोल करत राहणं आहे एक गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:52 PM2023-08-03T12:52:58+5:302023-08-03T12:53:26+5:30

Reels Addiction : हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या एका स्टडीनुसार, फार जास्त रील्स बघणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षण स्पष्ट दिसतात.

Reels Addiction : Know how to distance yourself from reels and social media | तासंतास मोबाइलवर स्क्रोल करत राहणं आहे एक गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

तासंतास मोबाइलवर स्क्रोल करत राहणं आहे एक गंभीर आजार, वेळीच व्हा सावध!

googlenewsNext

Reels Addiction Relief Tricks : आजकाल लोकांना सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवण्याची सवय फारच लागली आहे. लोक तासंतास रील्स बघत असतात आणि त्यांना वेळेचं भानही नसतं. डॉक्टरांनी या सवयीला एक नवीन आजार मानून याला मास सायकॉजेनिक इलनेस म्हणजे MPI असं नाव दिलं आहे. हॉवर्ड मेडिकल स्कूलच्या एका स्टडीनुसार, फार जास्त रील्स बघणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षण स्पष्ट दिसतात. या आजारात लोक नेहमीच बोलताना आपले पाय हलवतात. हे या आजाराचं एक पहिलं आणि मुख्य लक्षण आहे.

मानदुखी

हेल्थ एक्सपर्टनुसार, रोज बराच वेळपर्यंत मोबाइल फोन स्क्रोल करण्याने कंबर आणि मानदुखीची समस्या वाढते. मोबाइल बघण्यासाठी तुम्ही जेवढा वेळ मान झुकवता, त्याने मानदुखी आणि मणक्याचीही समस्या होते. 

कमी होतो फोकस

बराचवेळी रील्स बघितल्याने लोकांचा फोकस कमी होतो. ते कोणताही व्हिडीओ शेवटपर्यंत न बघता एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर पोहोचतात. हळूहळू ही त्यांची सवय बनते आणि ते कोणत्याही गोष्टीवर फोकस करू शकत नाहीत. ते सतत अस्वस्थ राहतात.

होतात अनेक आजार

मोबाइलवर जास्तीत जास्त वेळ घालवल्याने लोकांना झोप कमी येणे, मायेग्रेन, डोकेदुखी आणि डिप्रेशनची समस्या होऊ लागते. कारण मोबाइलमधून निळा प्रकाश निघतो, जो डोळ्यांना नुकसान पोहोचवतो. सोबतच डोकेदुखीही वाढवतो. अशा लोकांमध्ये शांत झोप न लागण्याची समस्या अधिक असते. झोप जर पूर्ण झाली नाही तर अनेक आजारांचा  सामना करावा लागतो.

कसा कराल बचाव?

सतत रील्स बघून होणाऱ्या आजारापासून बचावासाठी तुम्ही रोज पायी चला आणि योगा करा. मोबाइल गेमऐवजी बाहेरचे खेळ खेळा. जेवण करताना मोबाइल बघणं बंद करा. आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियाऐवजी समोरासमोर भेटा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक अॅप्स डाउनलोड करू नका. सोशल मीडियावर कमीत कमी राहण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Reels Addiction : Know how to distance yourself from reels and social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.