आनुवांशिकतेमुळे लठ्ठपणा वाढलाय? टेन्शन सोडून करा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 10:46 AM2019-08-07T10:46:44+5:302019-08-07T10:58:52+5:30
जेनेटिक रूपाने लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त लोकांना आता निराश होण्याची गरज नाही.
(Image Credit : www.emirates247.com)
अनेक लोक असे आहेत ज्यांना जीन्समुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. म्हणजे त्यांची इच्छा असो वा नसो आनुवांशिकतेमुळे त्यांचं वजन वाढू लागतं आणि त्यांना लठ्ठपणाचा धोका अधिक असतो. पण जेनेटिक रूपाने लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त लोकांना आता निराश होण्याची गरज नाही. एक्सपर्ट्सनी अशा काही एक्सरसाइज शोधून काढल्या, ज्याद्वारे आनुवांशिकतेमुळे आलेला लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो.
लठ्ठपणा दूर करण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज
(Image Credit : www.mnn.com)
अभ्यासकांना आढळलं की, नियमितपणे जॉगिंग करणे लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी बेस्ट एक्सरसाइज आहे. जॉगिंगशिवाय माउंटेन क्लायम्बिंग, वॉकिंग, पॉवर वॉकिंग, योग आणि काही डान्स स्टाइलही आहेत, जे आनुवांशिकतेमुळे लठ्ठपणा आलेल्या लोकांच्या बॉडी इंडेक्स म्हणजे BMI मध्ये कमतरता आणण्यास मदत करतात.
स्वीमिंग आणि सायकलिंगचा दिसला नाही फायदा
(Image Credit : livehealthy.chron.com)
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, लठ्ठपणाच्या जेनेटिक प्रभावाला कमी करण्यासाठी स्मीमिंग, सायकलिंग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजचा कोणताही फायदा बघायला मिळाला नाही. लठ्ठपणा ही एक चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. कारण यात व्यक्तीच्या जेनेटिक्स आणि लाइफस्टाइलमध्ये ताळमेळ बसवावा लागतो. डॉक्टर नेहमीच वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. पण ज्या लोकांचं वजन जेनेटिक रूपाने वाढलेलं असतं, त्यांना वेगळा असा सल्ला दिला जात असल्याचं कमी बघायला मिळतं.
नियमित एक्सरसाइज अधिक फायदेशीर
(Image Credit : www.cookinglight.com)
PLOS जेनेटिक्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये नॅशनल ताइवान युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी १८ हजार ४२४ ३० ते ७० वयोगटातील व्यक्तींची तपासणी केली. यादरम्यान प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक्ससोबतच एक्सरसाइज रूटीनचही निरिक्षण केलं. दरम्यान अभ्यासकांनी प्रत्येक वयस्क व्यक्तीचा लठ्ठपणा, बीएमआय, बॉडी फॅट आणि वेस्ट-हिप रेशिओची टेस्ट केली. सोबतच दुसऱ्या मेटाबॉलिक समस्यांवरही चर्चा केली. अभ्यासकांनी सांगितले की, जर तुमच्यात जेनेटिक लठ्ठपणा असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण नियमित एक्सरसाइज करून तुम्ही हा लठ्ठपणा कमी करू शकता.