Relation : ​पती-पत्नीचे प्रेम निरंतर राहण्यासाठी बेडरुममध्ये ‘या’ गोष्टी आवश्यक !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 07:09 AM2017-03-22T07:09:09+5:302017-03-22T12:39:09+5:30

आपणही बेडरूममध्ये 'या' गोष्टी करता का?

Relation: 'These' things are necessary in the bedroom to stay in love for husband and wife! | Relation : ​पती-पत्नीचे प्रेम निरंतर राहण्यासाठी बेडरुममध्ये ‘या’ गोष्टी आवश्यक !

Relation : ​पती-पत्नीचे प्रेम निरंतर राहण्यासाठी बेडरुममध्ये ‘या’ गोष्टी आवश्यक !

googlenewsNext
ong>-Ravindra More
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीच्या प्रेमात दूरावा निर्माण होत आहे. मात्र काही गोष्टींचे पालन केल्यास पती-पत्नींमधील प्रेम आणि शांती कायम राहू शकते. 

* बेडरूममध्ये तिसऱ्या व्यक्तीची चर्चा नकोच
पती-पत्नीचा बेडरूम म्हणजे दोघांचा निवांत क्षण एकत्र घालविण्याचा एक चांगला स्पॉट होय. यावेळी एकांतामध्ये फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसºया व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वत:विषयी चर्चा केल्यास वादाची स्थिती निर्माण होत नाही आणि जवळीकता, प्रेम वाढण्यास मदत होते. 
 
* झालेल्या चुकांवर चर्चा नको
आपल्या पार्टनरकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल तर यावेळी ही चर्चा शक्यतो टाळावी. त्या चुकीची वारंवार जाणीव करून देऊ नका. अशावेळी झालेल्या गोष्टींवर चर्चा करीत बसल्यास वाद आणि दु:खच पदरी पडते. यामुळे जुन्या चुकांवर जास्त चर्चा करत न बसता, भविष्याची योग्य मांडणी करावी.

* एकाने शांत राहावे
सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जोडीदार संताप करीत असेल तर त्यावेळी दुसऱ्याने शांत राहणे आवश्यक आहे. जर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी राग व्यक्त करत असेतील तर परिस्थिती बिघडत जाते. रागामध्ये मनुष्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टीची निवड करू शकत नाही. यामुळे सर्वात पहिले रागात आलेल्या जोडीदाराला शांत करण्याचा प्रयत्न करावा.

* आपले मत प्रेमाने मांडा
बऱ्याचदा पती-पत्नी एखाद्या विषयावर वेगवेगळा तर्क मांडतात आणि वाद निर्माण होतो. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावीत ती म्हणजे, आपली बाजू मांडा परंतु प्रेमाने. आपला तर्क प्रस्तुत करताना आपली भाषा, हावभाव, क्रोध यामध्ये अहंकार असू नये. शांततेत आणि प्रेमाने आपली गोष्ट जोडीदारासमोर ठेवल्यास वादाची स्थितीच निर्माण होणार नाही

* पार्टनरचे एकदातरी कौतुक करा
सर्वांनाच माहिती आहे की स्वत:चे कौतुक ऐकणे प्रत्येकला आवडते, विशेषत: कौतुक जोडीदार करत असेल तर जास्त आनंद प्राप्त होतो. पती-पत्नी दोघांनीही दररोज दिवसातून कमीत कमी एक चांगली गोष्ट एकमेकांबद्दल बोलावी. थोड्याच दिवसांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि प्रेम वाढेल.

* तणाव ठेवा दूर
अनेकदा काही लोक आॅफिसचा तणाव घरात घेऊन येतात. आॅफिसमध्ये बॉस किंवा इतर कर्मचारीसोबत झालेला वाद किंवा कामातील अपयश. अशा परिस्थितीमध्ये पत्नीने पतीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. तणावाचे कारण लक्षात घेऊन, तो दूर करण्याचा मार्ग दाखवावा. ही गोष्ट वैवाहिक जीवनात सुख-शांती तसेच प्रेम वाढवेल.
 
Also Read : SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !
  

Web Title: Relation: 'These' things are necessary in the bedroom to stay in love for husband and wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.