Relationship : कामाच्या तणावातही असे जपा नातेसंबंध !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 07:35 AM2017-06-29T07:35:38+5:302017-06-29T13:05:38+5:30

बऱ्याच सेलिब्रिटींनी एवढा ताण-तणाव असूनही आपले रिलेशन अगदी व्यवस्थित ठेवले आहे. मात्र ज्यांनी ताण-तणावाचे नियोजन केले नाही अशांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना सिनेसृष्टीत घडल्या आहेत.

Relationship: A similar relationship between work stress! | Relationship : कामाच्या तणावातही असे जपा नातेसंबंध !

Relationship : कामाच्या तणावातही असे जपा नातेसंबंध !

googlenewsNext
ते कोणतेही असो, ते खूप नाजुक असते. आपली वागणुक आणि विश्वासानेच ते मजबूत होत असते. मात्र बऱ्याचदा आपण आॅफिस किंवा इतर कामाच्या व्यापाने तणावात येतो. ज्याकारणाने घरात वाद सुरु होतात आणि नात्यातील प्रेम कमी होऊन दुरावा निर्माण होतो. बऱ्याच सेलिब्रिटींनी एवढा ताण-तणाव असूनही आपले रिलेशन अगदी व्यवस्थित ठेवले आहे. मात्र ज्यांनी ताण-तणावाचे नियोजन केले नाही अशांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्याच्या अनेक घटना सिनेसृष्टीत घडल्या आहेत. आपल्याही आयुष्यात असे काही घडू नये म्हणून या आहेत खास टिप्स.

* एक दिनचर्या ठरवून घ्या 
आपणास तणाव जेव्हा असतो तेव्हा आपले सर्व काम अव्यवस्थित असतात. सर्वप्रथम आपण लहान-लहान वस्तूंना रूटीनमध्ये आणा. मोबाईल, चावी आदी वस्तू ठेवण्यासाठी एकच ठिकाण निश्चित करावे. असे न झाल्याने अनावश्यक तणाव वाढतो आणि आॅफिसमध्ये पोहचल्यानंतर कामावर लक्ष केंद्रित करायला त्रास होतो. 

* सर्व कामांची यादी बनवा
आॅफिसात दिवसभर आपणास काय काम करायचे आहे याची एक यादी बनवून घ्या किंवा डायरीमध्ये लिहून ठेवा. यात सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि क मी महत्त्वाच्या कामांना शेवटी समावेश करा. यामुळे जरी वेळ शिल्लक नाही राहिला तरी फारसे नुकसान होत नाही. 

* कामादरम्यान ब्रेक हवाच 
सतत काम केल्याने थकवा जाणवतो. कामाच्या व्यापामुळे जर मन भटकत असेल तर अशावेळी आपल्या जागेवरच बसून लांब श्वास घ्यावा आणि दोन मिनिटासाठी डोळे बंद करावे. यामुळे शरीरात आॅक्सिजनचे प्रमाण वाढून काम करण्यासाठी रिचार्ज व्हाल. 

*काम करताना वातावरण पोषक हवे
काम करतेवेळी जर जवळपास गोंधळ असेल तर आपण तणावात येऊ शकता. कामादरम्यान वातावरण शांत असणे गरजेचे आहे. यामुळे आपले कामात मन तर लागेलच शिवाय कामदेखील लवकर होईल. 

Also Read : ​तणावाने घालवाल नोकरी..!
                    : असे रहा तणावमुक्त !!!
   

Web Title: Relationship: A similar relationship between work stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.