दिलासादायक! भारतात 'या' ३ औषधांनी होणार कोरोना रुग्णांचे उपचार; शासनाची मंजूरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:35 AM2020-06-15T11:35:00+5:302020-06-15T11:36:36+5:30

CoronaVirus News Updates : याशिवाय रुग्णांना किती प्रमाणात औषध दिलं जावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. 

Remdesivir tocilizumab and plasma therapy get approval for corona virus treatment in india | दिलासादायक! भारतात 'या' ३ औषधांनी होणार कोरोना रुग्णांचे उपचार; शासनाची मंजूरी

दिलासादायक! भारतात 'या' ३ औषधांनी होणार कोरोना रुग्णांचे उपचार; शासनाची मंजूरी

googlenewsNext

 कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गंभीर आजारांत वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांवर करण्यात येत आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाने संक्रमित लोकांचे उपचार करण्यासाठी काही नियमांचा संच तयार केला आहे. आरोग्य मंत्रालयाद्वारे एंटी व्हायरल ड्रग रेमडेसिवीर तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे टोसीलीजुमॅब आणि प्लाज्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

भारत में इन 2 दवाओं से होगा कोरोना का इलाज, सरकार ने दी मंजूरी

याआधीही रेमडेसिवीर आणि प्लाज्मा थेरेपी या दोन पद्धतींद्वारे कोरोना रुग्णांवर करण्यात येणारे  उपचार रोखण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार क्लीनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा अहवाल आल्यानंतर आता या औषधांना मंजरी देण्यात आली आहे. याशिवाय  रुग्णांना किती प्रमाणात औषध दिलं जावं याबाबतही माहिती देण्यात आली आहे. 

भारत में इन 2 दवाओं से होगा कोरोना का इलाज, सरकार ने दी मंजूरी

नवीन रिपोर्टनुसार कोरोना रुग्णांनां सुरूवातीच्या स्टेजला एंटी मलेरिया ड्रग हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन देण्याचा सल्ला देण्यात आला होता. तरी गंभीर  स्थितीत रुग्णांना हे औषध देणं योग्य नाही. ईसीजीनंतर रुग्णाला हे औषध द्यायला हवे. 

भारत में इन 2 दवाओं से होगा कोरोना का इलाज, सरकार ने दी मंजूरी

 रेमडेसिवीर हे एक न्यूक्लियोसाइड राइबोन्यूक्लिक एसिड (RNA) पोलीमरेज इनहिबिटर इंजेक्शन आहे. आफ्रिकेतील देशात वेगाने पसरत असेलल्या इबोला  या आजाराच्या उपचारांसाठी अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपनी गिलियड सायंसेज ने तयार केले होते.  

भारत में इन 2 दवाओं से होगा कोरोना का इलाज, सरकार ने दी मंजूरी

प्लाज्मा थेरेपीने रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर माणसाचे शरीर एंटी बॉडीज निर्माण करतात. एंटी बॉडीज शरीरात योग्य प्रमाणात तयार झाल्यानंतर व्हायरस स्वतःहून नष्ट होतो. अशा स्थिती व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर आलेल्या रुग्णांच्या शरीराती एंटीबॉडी काढू इतर संक्रमित व्यक्तींच्या  शरीरात टाकून व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो. 

खुशखबर! कोरोना विषाणूंना निष्क्रिय करणार पोलिओची लस; मृत्यूचा धोका होईल कमी, वाचा रिसर्च

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Web Title: Remdesivir tocilizumab and plasma therapy get approval for corona virus treatment in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.