सतत बसून कंबरदुखीने झालात हैराण, तर हे नक्की वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:08 AM2020-01-03T11:08:53+5:302020-01-03T11:16:02+5:30

सध्याच्या काळात अनेक लोकांना तासनतास ऑफिसमध्ये बसून काम कराव लागतं.

Remedies for back pain relief in winters | सतत बसून कंबरदुखीने झालात हैराण, तर हे नक्की वाचा...

सतत बसून कंबरदुखीने झालात हैराण, तर हे नक्की वाचा...

googlenewsNext

सध्याच्या काळात अनेक लोकांना तासनतास ऑफिसमध्ये बसून काम कराव लागतं. तसंच काही महिला घरात काम करत असताना फक्त शरीराची हालचाल होत असते.  बाकीवेळ बसून राहिल्यामुळे  कमरेचे आणि पाठीचे दुखणे सुरू होते. अनेकदा या दुखण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा फटका आरोग्याला बसण्याची शक्यता असते. अनेकदा रोजच्या  पाठ आणि कंबर दुखीकडे दुर्लक्ष  केल्यास मणक्यांचा त्रास उद्भवून  शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागू शकते.  तुम्हाला सुद्धा अशा समस्यांचा सामना करावा  लागत असेल तर जाणून घ्या कंबर आणि पाठ दुखण्याची कारणं काय आहेत. 

बदलत्या जीवनशैलीत लोकांच्या शरीरात  वेगवेगळ्या भागांवर त्रास होत असतो. ८-९ तास एकाच जागी बसल्यामुळे  लोकांचा पार्श्वभाग किंवा कंबर आणि पाठ त्यांच्यात वेदना व्हायला सुरूवात होते. हे दुखणे अनेक दिवस तसंच राहिल्यामुळे मोठा आजार होण्याची शक्यता असते. 


 तासनतास एकाच जागी बसून राहील्यामुळे पाठीचे आणि कमरेचे दुखणे जाणवते. तसंच व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्यात ताळमेळ नसणे.  शरीरातील पोषक घटकांची  कमतरता यांमुळे लोकांना पाठ दुखीचा सामना सर्वाधिक सहन करावा लागतो. तसंच प्रवासा दरम्यान जर तुम्ही जास्तवेळ बसून राहत असाल तर ही  समस्या जाणवते.

पाठ दुखण्याची समस्या उद्भवू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं. गरजेचं आहे. चालताना किंवा  बसताना तुमची पाठ सरळ राहील अशा स्थितीत बसा. खासकरून एकाचजागी बसून जास्त वेळ काम करत असलेल्या लोकांना या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं  आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना सतत बसलेल्या स्थितीत असाल तर  तर थोड्या थोड्या वेळानंतर चालण्याची सवय ठेवा. ब्रेकच्या वेळेत तुम्ही चालण्यासाठी जाऊ शकता. 

पाठीचे दुखणे असलेल्या लोकांनी आहारात विटामीन डी३, सी, आणि कॅल्शियम तसंच फॉस्फरस  आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.  जर तुम्ही मासांहार करत असाल तर पाठ दुखण्याची समस्या कमी करण्यासाठी आहारात माशांचा समावेश करा.  ज्यामुळे  तुमची हाडं मजबूत होऊन कंबर, पाठ दुखण्यापासून आराम मिळेल. आहारात डिंकाचे लाडू किंवा डिंकाचा समावेश अवश्य करा. 

Web Title: Remedies for back pain relief in winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.