तुमचा मूड ऑफ आहे? मूड फ्रेश करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:27 PM2019-02-06T17:27:03+5:302019-02-06T17:28:10+5:30

सध्या प्रत्येकाला एखाद्या गोष्टीवर त्वरीत उपायाची गरज असते. कारण प्रत्येकाकडेच वेळेची कमतरता आहे. कारण आपलं सध्याचं जीवन अत्यंत व्यस्त आहे. प्रत्येक दिवशी कामासाठी धावपळ करावी लागते.

Remedies to be happy after being sad ways to instantly feel better and happy | तुमचा मूड ऑफ आहे? मूड फ्रेश करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत

तुमचा मूड ऑफ आहे? मूड फ्रेश करण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत

googlenewsNext

सध्या प्रत्येकाला एखाद्या गोष्टीवर त्वरीत उपायाची गरज असते. कारण प्रत्येकाकडेच वेळेची कमतरता आहे. कारण आपलं सध्याचं जीवन अत्यंत व्यस्त आहे. प्रत्येक दिवशी कामासाठी धावपळ करावी लागते. ज्यामुळे अनेकदा आपल्याला तणावाचाही सामना करावा लागतो. तणावाचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. याव्यतिरिक्त आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की, जेव्हा आपण दुःखी असतो. अशातच आपण कोणतंही काम करण्याची इच्छा उरत नाही. तुम्ही काही सहज सोप्या टिप्सच्या मदतीने स्वतःला खूश ठेवू शकता. 

दुखातून आनंदी राहण्यासाठी काही उपाय :

मोठा श्वास घ्या

मोठा श्वास घेतल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे मेंदूपर्यंत मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. जेव्हा ब्रेनपर्यंत ऑक्सिजन अधिक पोहोचतो. तेव्हा मेंदूला चालना मिळते आणि तो उत्तम काम करतो. तसेच त्यामुळे मेंदूमध्ये फील-गुड हार्मोन रिलिज करतो. ज्यामुळे तुम्हाला खूश होण्यास मदत होते. 

म्युझिक ऐका

म्युझिक ऐकल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अ‍ॅडोर्फिन हार्मोन रिलीज होतात. जे तुम्हाला आनंदी करण्याचं काम करतात. त्यामुळे लगेच खूश होण्यासाठी तुम्हाला आवडणारं म्युझिक ऐका. 

बाहेर जा

जेव्हा तुम्ही दुःखी असता त्यावेळी तुम्हाला एकटं बसावसं वाटतं. अशावेळी घरामध्ये एकटं शांत बसून राहणं पसंत करता. असं केल्यामुळे तुम्ही स्वतःला आणखी तणावामध्ये टाकत असता. अशावेळी घरामध्ये एकटं बसण्यापेक्षा बाहेर फिरायला जा. वॉकसाठी जा. त्यामुळे मन शांत होण्यास मदत होते. 

नवीन पदार्थ तयार करा

जर तुम्हाला तुम्ही मूड फ्रेश करण्यासाठी अनेक उपाय करून थकला असाल तर तुमच्यासाठी सर्वात हटके उपाय म्हणजे, घरातल्यांसाठी किंवा प्रियजनांसाठी काहीतरी नवीन पदार्थ तयार करा. त्यामुळे तुमचं मन आनंदी होण्यास मदत होईल. 

खूप हसा

हसण्यामुळे तुमचा मूड चांगला आणि आनंद राहण्यासाठी मदत होते. जेव्हा तुम्ही दुःखी असता, त्यावेळी हसणं फार अवघड असतं. पण जेव्हा तुम्ही हसण्याचा प्रयत्न करत असता. त्यावेळी मेंदूला तुम्ही आनंदी असल्याचा संकेत मिळतो. त्यामुळे मेंदू हॅप्पी हार्मोन एंडोर्फिन रिलीज करतो. ज्यामुळे तुमचा मूड आनंदी राहण्यास मदत होते. 

Web Title: Remedies to be happy after being sad ways to instantly feel better and happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.