थंडीत बोट सुजुन सुन्न पडतात? चिंता नको! तज्ज्ञांनी सांगितलेले हे उपाय देतील चटकन आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:27 PM2022-01-18T16:27:42+5:302022-01-18T16:33:02+5:30
आपल्या सर्वांना माहीत आहे की, सुन्न बोटांनी काम करणं अशक्य होतं. कधीकधी सूज आणि वेदना इतक्या प्रमाणात वाढतात की, ते असह्य होतं. काही दिवस उपचार न करताही आपोआप आराम मिळू लागतो. पण कधी कधी हा त्रास कमी होण्याचं (Winter Health Tips) नाव घेत नाही.
हिवाळ्यात जर तुमची बोटं सुन्न होत असतील किंवा बधीर होत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, सुन्न बोटांनी काम करणं अशक्य होतं. कधीकधी सूज आणि वेदना इतक्या प्रमाणात वाढतात की, ते असह्य होतं. काही दिवस उपचार न करताही आपोआप आराम मिळू लागतो. पण कधी कधी हा त्रास कमी होण्याचं (Winter Health Tips) नाव घेत नाही.
प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यामध्ये बोटं सुन्न होण्याची आणि बोटांना सूज येऊन एकाच जागी रक्तसंचय होण्याची समस्या वाढते. यामुळं वेदना किंवा मुंग्या येणं आदी समस्या उद्भवतात. हिवाळ्यात या समस्येचं मुख्य कारण म्हणजे रक्तवाहिन्या अरुंद होणं आणि शरीराच्या अवयवांपर्यंत कमी ऑक्सिजन पोहोचणं. त्यामुळं बोटं सुन्न होऊ (winter Fingers care) लागतात. त्याची लक्षणं आणि ही समस्या टाळण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊ.
बोटं सुन्न होण्याची लक्षणं
- वेदना आणि स्पर्श किंवा काहीही समजण्यात अडचण
- बोटाला नेहमी सूज येत राहणं.
- बोटं हलवण्यात अडचण.
बोट सुन्न होण्याची कारणं आणि उपाय
थंडीमुळं बोटं सुन्न किंवा बधीर होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.
१. कोरफड (aloe vera)
सर्वप्रथम, ताजा कोरफडीचा गर घ्यावा आणि तो सुन्न झालेल्या बोटावर लावावा. अर्धा तास तसंच राहू द्यावं. यामुळं सूज कमी होईल.
२. अॅपल सायडर व्हिनेगर
एक चमचा पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून कापसाच्या मदतीनं बोटाला लावा. याच्यामुळं खूप चांगला परिणाम मिळेल.
३. हळद
हळदीमध्ये पाण्याचं काही थेंब मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट सुन्न झालेल्या बोटावर लावा. यामुळं सूज आली असल्यास ती कमी होईल आणि वेदनाही थांबतील.
४. एप्सम सॉल्ट
एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्या पाण्यात एक चमचा एप्सम सॉल्ट घाला आणि चांगलं मिसळा. ज्या बोटात वेदना होत असतील ते बोट बुडवून त्यात अर्धा तास तसंच राहू द्या. तुम्हाला आराम मिळेल.
बोटं सुन्न होणं अशा प्रकारे टाळता येईल
बोटं सुन्न होऊ नयेत किंवा बधीर होऊ नयेत, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी खाली काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
- बोटं सुन्न झाली असतील किंवा थोडी दुखत असतील तर, त्या बोटांना पूर्ण विश्रांती द्यावी.
- इजा होऊ शकेल अशा क्रियाकलापांपासून दूर रहा.
- तुमची बोटं बरी होत असल्यास बोटांचा व्यायाम करा
- याशिवाय, इतर काही आजार नाही ना, याची तपासणी करून डॉक्टरांचं मत घेणंही खूप महत्त्वाचं आहे.
- कोणतंही वजन उचलताना बोटांवर जास्त जोर देऊ नका.