खूप प्रयत्न करूनही रात्री लवकर झोप येत नाही का? 'या' उपायांनी येईल तुम्हाला गाढ झोप...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:16 PM2021-05-11T13:16:18+5:302021-05-11T13:49:45+5:30
झोपेसाठी किती वेळ तळमळत राहणार? खा या पाच गोष्टी आणि झोपा शांत
झोप ही अशी एक गोष्ट आहे जी पूर्ण नाही झाली तर शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. आता पुरेशी झोप म्हणजे किती? तर ७ ते ८ तास. अनेकांच्या बाबतीत असे होते की रात्री काही केल्या झोप येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही थकवा जाणवतो. यावर काही सोपे उपाय आहेत. खाली दिलेले पदार्थ खाल तर तुम्हाला काहीचवेळात शांत झोप लागेल.
बदाम
रोज ३ ते ५ बदाम झोपण्यापूर्वी खा. बघा तुम्हाला शांत झोप येते की नाही. बदामामध्ये मेलाटोनिन असते ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती डाएटवर आहेत त्यांनी, बदाम नक्कीच खावेत.
गरम दूध
जेवण झाल्यानंतर एका तासाने दूध प्यावे. यामुळे झोप उत्तम येते. मात्र, जर तुम्ही मसालेदार अन्न खाल्ले असेल तर दुध न पिणेच योग्य कारण यामुळे अॅसिडिटी वाढते.
डार्क चॉकलेट
चॉकलेट कोणाला नाही आवडत. पण प्रत्येकाला डार्क चॉकलेट आवडतंच असं नाही. तरीही तुम्ही तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर डार्क चॉकलेट नक्की खा. डार्क चॉकलेटमुळे शरीरात सेरोटेनिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे मन शांत होते आणि अर्थातच शांत झोप लागते.
सफेद तांदळाचा भात
कोकण तसेच किनारीभागातील लोकांचं तांदुळ हे मुख्य अन्न आहे. रोज झोपण्याआधी भात खाल्ल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
कॅमोमाईल चहा
कॅमोमाईल चहा तुमच्या नसांना शांत करतो. खरंतर झोप येण्यास त्रास होत असेल तर हा चहा अत्यंत उत्तम उपाय आहे. रोज एखादे छान पुस्तक वाचताना कॅमोमाईल चहाचा आस्वाद घ्या. शांत झोप लागेल.