अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या, वेळीच या सोप्या उपायांचा करा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 03:59 PM2022-08-05T15:59:55+5:302022-08-05T16:01:52+5:30

काही विषारी द्रव्यांमुळे (Toxic substance) रक्त अशुद्ध होतं. त्यामुळे अ‍ॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीनं रक्त शुद्ध ठेवू शकता.

remedies to clean or detox your blood | अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या, वेळीच या सोप्या उपायांचा करा उपयोग

अशुद्ध रक्तामुळे निर्माण होऊ शकतात गंभीर समस्या, वेळीच या सोप्या उपायांचा करा उपयोग

googlenewsNext

रक्त (Blood) हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रक्त दूषित झाल्यास विविध आजारांचा (Disease) धोका वाढतो. रक्त दूषित होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. रक्तामुळे शरीरातल्या सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन (Oxygen) आणि पोषक द्रव्य पोहोचतात. तसंच शरीरातल्या उतींपर्यंत हॉर्मोन्स वाहून नेण्याचं काम रक्त करतं. त्यामुळे रक्ताशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर पाहायला मिळतो.

गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी रक्त शुद्ध आणि विषारी घटकांपासून मुक्त असणं गरजेचं आहे. काही विषारी द्रव्यांमुळे (Toxic substance) रक्त अशुद्ध होतं. त्यामुळे अ‍ॅलर्जी आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही काही घरगुती उपायांच्या मदतीनं रक्त शुद्ध ठेवू शकता. `लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आरोग्यासाठी रक्त शुद्ध राहणं गरजेचं असतं. काही विषारी घटकांमुळे रक्त अशुद्ध होतं. यामुळे मुरमं, फोड, पुरळ, अ‍ॅलर्जी यांसारखे त्वचाविकार, तसंच अन्य गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. जीवनसत्त्वं आणि खनिजयुक्त पदार्थ खाल्ल्यानं शरीरात विषारी द्रव्य तयार होत नाहीत. रक्त शुद्ध राहण्यासाठी आहारात ब्लू-बेरी, ब्रोकोली, बीट किंवा गुळसारखे पदार्थ समाविष्ट करू शकता.

या पदार्थांमध्ये आयर्न, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स, फॉस्फरस, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक असतात. याशिवाय रक्त शुद्ध राहण्यासाठी काही अन्य घरगुती उपायही (Home Remedies) फायदेशीर ठरतात. लिंबात व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतं. लिंबू पाणी हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक (Detox Drink) आहे. सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्यास रक्त शुद्ध राहतं.

आयुर्वेदानुसार ब्राह्मी ही वनस्पती गुणकारी मानली जाते. रक्त शुद्ध करण्याव्यतिरिक्त मेंदूच्या आरोग्यासाठीही ती फायदेशीर असते. ब्राह्मीच्या रसात मध मिसळून प्यायल्याने नक्कीच फायदा होतो. सफरचंदाचं व्हिनेगार पाण्यात मिसळून प्यायल्यास शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत होते. रक्त शुद्धतेसाठी सकाळी रिकाम्यापोटी सफरचंदाच्या व्हिनेगारमध्ये (Apple Vinegar) लहान अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून ते पिणं फायदेशीर ठरतं; मात्र उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हिनेगारचं सेवन करावं.

हळदीत अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी दूध-हळद (Milk And Turmeric) घेतल्यास शरीरातले अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्यास आणि रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अँटीबायोटिक गुणधर्म असतात. रक्त शुद्ध होण्यासाठी हे सर्वोत्तम औषध असल्याचं तज्ज्ञ सांगतात. रक्तातले विषारी घटक शरीराबाहेर टाकून रक्त शुद्ध करण्यासाठी तुळशीची पानं उपयुक्त ठरतात. तुळशीची पानं पाण्यात उकळून ते पाणी गार करून पिणं उपयुक्त ठरतं.

सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची चार ते पाच पानं (Neem Leaves) चघळल्यास रक्त शुद्ध होतं. कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटीफंगल गुणधर्म असतात. रक्तातले विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी या पानांचा वापर हितावह ठरतो.

Web Title: remedies to clean or detox your blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.