सतत शिंकत असाल तर मास्कचा काही उपयोग नाही; कारण वारंवार शिंकल्याने 'असा' होत आहे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:08 PM2020-06-19T16:08:25+5:302020-06-19T16:14:36+5:30

मास्क वापरत असताना सतत शिंकल्यामुळे मास्कची परिणामकारकता कमी होऊ शकते.

Repeated coughing adversely affects filtering capacity of face masks says study | सतत शिंकत असाल तर मास्कचा काही उपयोग नाही; कारण वारंवार शिंकल्याने 'असा' होत आहे परिणाम

सतत शिंकत असाल तर मास्कचा काही उपयोग नाही; कारण वारंवार शिंकल्याने 'असा' होत आहे परिणाम

Next

कोरोनाच्या माहामारी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. कारण एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा  खोकण्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यापासून बचाव होण्याासाठी तसंच संसर्ग टाळण्याासाठी मास्कचा वापर केला जात आहे. मास्कच्या वापराबाबत नवीन  माहिती समोर येत आहे.  मास्क वापरत असताना सतत शिंकल्यामुळे मास्कची परिणामकारकता कमी होऊ शकते.

तोंडाला मास्क लावल्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका कमी होते. कारण मास्कमुळे लाळेतील विषाणूंचे ड्रॉपलेट्स नाकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की सतत शिंकल्यामुळे मास्कची फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. साइप्रस में यूनिवर्सिटी ऑफ निकोसियातील तज्ज्ञ दिमित्रिस द्रिकाकिस यांनी कम्प्यूटर मॉडेलवर परिक्षण केले होते. यातून असं दिसून आलं की, एखाद्या व्यक्तीने मास्क लावला असेल आणि तो सतत शिंकत असेल तर त्यातून लहान लहान ड्रॉपलेट्स बाहेर येण्याची शक्यता असते. 

या आधीच्या आभ्यासातून दिसून आलं की, जेव्हा मास्क न लावलेल्या व्यक्ती शिंकतो तेव्हा त्याच्या लाळेचे ड्रॉपलेट्स पाच सेकंदात १८ फुटांच्या अंतरापर्यंत पसरतात. फिजिक्स ऑफ फ्लूइड्स मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अध्ययनात मास्कच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्यात आला होता. 

या अभ्यासानुसार मास्कमुळे हवेतील लाळेच्या थेंबामार्फत होणारं संक्रमण कमी होते.  पण सतत शिंकल्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी सांगितले की, मास्क लावल्यानंतरही लाळेचे थेंब दूरवर जाऊ शकतात. त्यामुळे मास्कच्या वापराबाबत  काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. मास्कच्या पुढच्या बाजूला स्पर्श करू नका. मास्कच्या वापराबाबत गाईडलाईन्सचं पालन करा.या संशोधनातून समोर आलेल्या माहिती  लक्षात घेऊन आरोग्य कर्मचारी,  कोरोना रुग्ण,  साध्या सर्दी, खोकल्याच्या समस्या असलेल्या लोकांनी काळजी घ्यायला हवी. 

लॉकडाऊनमध्ये वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरच्याघरी करा 'ही' सोपी योगासनं

कोरोना रुग्णांचे जीव वाचवणार डेक्झामेथॅसोन; नक्की या औषधांचा कसा होतो परिणाम? जाणून घ्या

Web Title: Repeated coughing adversely affects filtering capacity of face masks says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.