RESEARCH : ...तर शरीरात ‘या’ ठिकाणी लपलेला असतो ‘एड्स’ व्हायरस !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 12:46 PM2017-03-25T12:46:32+5:302017-03-25T18:16:32+5:30
संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, एड्स या भयंकर रोगाचा व्हायरस मानवी शरीरात कोठे सापडतो याची माहिती मिळाली आहे...
Next
संपूर्ण जगभरात करोडो लोकांना एड्स सारख्या महाभयंकर रोगाने कवटाळले आहे. या रोगाची एकदा का लागण झाली तर मृत्यु शिवाय पर्याय नाही. अनेक संशोधन होऊनही आजदेखील या रोगावर प्रभावी औषध उपलब्ध नाही. मात्र एक आनंदाची बातमी अशी की, या रोगाचा व्हायरस शरीरात कोठे लपतो, याची माहिती मिळवण्यात संशोधकांना नक्कीच यश आले आहे.
फ्रान्सच्या सीएनआरएस रिसर्च इस्टीट्यूटच्या संशोधकांनी याबाबत दावा केला आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, एड्स या भयंकर रोगाचा व्हायरस मानवी शरीरात कोठे सापडतो याची माहिती मिळाली आहे. संशोधनानुसार, मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींमध्ये एड्सचा व्हायरस लपतो. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीच या व्हायरसला जागा देत असल्यामुळे एचआयव्हीवर नियंत्रण मिळवणाऱ्या औषधांना हा व्हायरस दाद देत नाही. दरम्यान, एड्सच्या व्हायरसचे लपण्याचे ठिकाण सापडणे हे एक संशोधनातले मोठे पाऊल आहे. त्यामुळे लवकरच पांढऱ्या पेशींमधल्या एड्सच्या व्हायरसचे समूळ उच्चाटण करण्याबाबतचा उपाय शोधला जाईल. त्याबाबत दूरगामी संशोधनही सुरू झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
या बाबतच्या संशोधनाचे वृत्त नेचर पत्रीका नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशीत करण्यात आले आहे. हे संशोधन एड्सवर केल्या जाणाऱ्या संशोधनाचे नेतृत्व करेन तसेच, हा व्हायरस नेस्तनाबूत करण्यासाठीही हे संशोधन काम करेल, असेही या जर्नलमध्ये दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, एचआव्हीवर सध्या कोणताच इलाज नाही. त्यामुळे या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीला आयुष्यभर औषधे घेऊनच जगावे लागते. सुरूवातीला डॉक्टरी उपायांनी आणि औषधांनी हा आजार नियंत्रणात येतो. मात्र, काही वर्षांनी हा आजार पुन्हा डोके वर काढतो. एचआयव्ही आजाराने पीडित व्यक्तीच्या शरीरात सुमारे २०० अरब सीडी ४ टी पेशी असतात. त्यातील १० लाखांपैकी कोणतीही एक पेशी एड्सचा व्हायरस लपविण्याचे काम करते.