Research : ​​...आता मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 07:27 AM2017-05-19T07:27:30+5:302017-05-19T12:57:30+5:30

रक्तसाठ्याचा तुटवडा पाहता, संशोधकांनी रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींची प्रथमच निर्मिती केली असून यापुढे मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होऊ शकतो.

Research: ... now the human bloodstation will be available unlimited! | Research : ​​...आता मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होणार !

Research : ​​...आता मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होणार !

Next
्तसाठ्याचा तुटवडा पाहता, संशोधकांनी रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींची प्रथमच निर्मिती केली असून यापुढे मानवी रक्तसाठा अमर्याद उपलब्ध होऊ शकतो. यामुळे रक्तसाठ्याच्या तुटवड्यापासून मुक्तता मिळणार असून रक्तातील आजारांवर उपचार करण्यासाठी याची मोठी मदत मिळणार आहे. 
स्टेम पेशींपासून रक्ताच्या पेशी तयार करण्याचा आमच्या प्रयत्नाला यश येत असून, आम्ही त्याच्या अतिशय जवळ असल्याचे, अमेरिकेतील मुलांच्या रुग्णालयामधील जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे. 
शरीरातील सर्व पेशी तयार करण्याचे काम स्टेम सेल करतात. शरीरातील एखादी पेशी नष्ट  अथवा खराब झाली असेल तर ती नव्याने तयार करण्याचे काम स्टेम पेशी करतात. या आधारावर रोगप्रतिकारक रक्ताच्या पेशी स्टेम पेशींच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतात. रुग्णांवर उपचार करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर ठरू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
पेशींची निर्मिती प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशींपासून होते. प्लुरीपोटेन्ट स्टेम पेशी अनेक प्रकारच्या मानवी रक्ताच्या पेशी उंदरांमध्ये निर्माण करतात, असे संशोधकांनी सांगितले.
या रक्त पेशींची निर्मिती झाल्यामुळे आनुवंशिक रक्ताचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच इतर ठिकाणी रक्ताचा पुरवठा करण्यासाठीही याची मदत होऊ शकणार असल्याचे, जॉर्ज डॅले यांनी म्हटले आहे.  

Web Title: Research: ... now the human bloodstation will be available unlimited!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.