दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:03 PM2022-09-15T12:03:12+5:302022-09-15T12:04:57+5:30

Oral Health Tips: प्लाक एक चिकट पदार्थाचा थर असतो, जो दातांवर चिकटतो. यामुळे दात हळूहळू सडू लागतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, खराब ओरल हायजीनमुळे लिव्हर कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.

Research poor oral health increases liver cancer risk by up to 75 percent | दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका

दात सडले तर होऊ शकतो जीवाला धोका, 75 टक्के वाढतो लिव्हर कॅन्सरचा धोका

googlenewsNext

Oral Health Tips: दातांची स्वच्छता आरोग्यासाठी फार गरजेची असते. आजकाल मार्केटमध्ये दातांच्या स्वच्छतेसाठी अनेक प्रॉडक्ट्स मिळतात. हेल्थ एक्सपर्टचं मत आहे की, आपल्याला रोज दातांच्या स्वच्छतेसाठी त्यांची काळजीही घ्यावी लागते. जर नियमितपणे दातांची स्वच्छता केली नाही तर त्यांमध्ये प्लाक जमा होतो. प्लाक एक चिकट पदार्थाचा थर असतो, जो दातांवर चिकटतो. यामुळे दात हळूहळू सडू लागतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, खराब ओरल हायजीनमुळे लिव्हर कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.

क्वीन्स यूनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये झालेल्या रिसर्चनुसार, खराब ओरल हायजीन लिव्हर कॅन्सरचं कारण ठरू शकते. रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांनी सांगितलं की, ज्या लोकांना तोडांचे आजार असतात जसे की, हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडाला फोड येणे, दात तुटने किंवा हलणे या समस्या होत्या या लोकांना हेपेटोकेल्युलर कार्सिनोमाचा 75 टक्के धोका होता. हे लिव्हर कॅन्सरचं मोठं कारण आहे.

रिसर्चमधून खुलासा

या रिसर्चमध्ये ब्रिटनच्या साडे 4 लाखांपेक्षा जास्त लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांमध्ये ओरल हेल्थ आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरच्या धोक्याचं विश्लेषण करण्यात आलं. अभ्यासकांना आढळलं की, रिसर्चमध्ये सहभागी लोकांपैकी 4, 069 लोकांना 6 वर्षात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर झाला. यातील 13 टक्के केसेसमध्ये रूग्णांमध्ये खराब ओरल हायजीन आढळून आली.

काय सांगतात एक्सपर्ट?

अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की, ओरल हेल्थने लिव्हर कॅन्सरचा धोका कसा वाढतो? याबाबत एक्सपर्टने सांगितलं की, यामागे दोन कारणे असू शकतात. पहिलं कॅन्सरमध्ये ओरल आणि आतड्यांमध्ये मायक्रोबायोमची भूमिका. तेच दुसरं कारण हे असू शकतं की, खराब ओरल हेल्थ असलेले पौष्टिक पदार्थ खाऊ शकत नाहीत. याने त्यांना लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो. लिव्हर कॅन्सर झाल्याने वजन कमी होतं, काविळ, वेदना आणि पोटावर सूज यांसारख्या समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला या समस्या असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Research poor oral health increases liver cancer risk by up to 75 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.