गुलाबाच्या सुगंधाने मिळवा चांगली झोप आणि तल्लख बुद्धी, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 06:03 PM2020-02-03T18:03:33+5:302020-02-03T18:07:55+5:30

प्रेमाची भावना व्यक्त करताना एकमेकांना गुलाबाचं फूल दिलं जातं.

Research :Rose flowers are beneficial for good sleep as well as for brain | गुलाबाच्या सुगंधाने मिळवा चांगली झोप आणि तल्लख बुद्धी, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

गुलाबाच्या सुगंधाने मिळवा चांगली झोप आणि तल्लख बुद्धी, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च

Next

प्रेमाची भावना व्यक्त करताना एकमेकांना गुलाबाचं फूल दिलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का गुलाबाच्या फुलाचा सुगंध शरीरासाठी सुद्धा खूपच फायदेशीर असतो. गुलाबाच्या फुलावर अलिकडच्याच काळात एक रिसर्च करण्यात आला. त्यानुसार गुलाबाचं फुलं मेंदूसाठी आणि चांगल्या झोपेसाठी लाभदायक ठरत असतं. गुलाबाच्या सुगंधामुळे शांत झोप येते. 

जर्मनीतील यूनिवर्सिटी ऑफ फ्रीबर्गचे मुख्य संशोधक जुर्गन कोर्नमीयर यांनी असं सांगितले की ज्यावेळी  झोपताना आणि शिक्षण घेताना जर गुलाबाची अगरबत्तीचा वापर केल्यामुळे ३० टक्के मुलींना अभ्यासात यश मिळाले. चांगला अभ्यास झाला. यासाठी दोन  भागांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली होती. ज्या एका गटाला गुलाबाच्या सुगंधासह ठेवण्यात आले होते. तर दुसरा गट हा गुलाबाच्या सुंगंधाशिवाय ठेवण्यात आल होता. रिसर्च करत असलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या असं निदर्शास आलं की गुलाबाचा सुगंध रोजच्या आयुष्यात खूप बदल घडवून आणत असतो. ( हे पण वाचा-लूज मोशनमुळे सतत टॉयलेटच्या फेऱ्या मारून वैतागलात? 'या' घरगुती उपायांनी मोशन झटपट होईल दूर...)

तसंच रोज परिक्षेचा अभ्यास करत असलेल्या मुलांच्या डेस्कवर गुलाबाचा सुगंध असणारी अगरबत्ती ठेवण्यात आली.  तर दुसरा गट रोज सारखंच अगरबत्तीशिवाय अभ्यास करत होता. परिणाम रिसर्चकर्त्यांच्या निदर्शनास आले की जी मुलं गुलाबाच्या सुगंधासह अभ्यास करत होती. त्याची चांगली प्रगती झाली होती. म्हणजेच विद्यार्थांवर करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की गुलाबाच्या सुगंधामुळे रोजचे जीवन जगत असताना  झोप चांगली येते. तसंच स्मरणशक्ती सुद्धा वाढते. ( हे पण वाचा-रिकाम्या पोटी पेरू खाल्याने पोट साफ होण्यासह मिळेल 'या' गंभीर आजारांपासून सुटका!)

Web Title: Research :Rose flowers are beneficial for good sleep as well as for brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.