आपण रोज खात असलेल्या 'या' पदार्थामुळे कमजोर होते इम्यूनिटी, वेळीच व्हा सावध नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 12:38 PM2021-06-09T12:38:34+5:302021-06-09T12:40:09+5:30

मिठाचं अधिक सेवन केल्याने नुकसानही होतात. एका नव्या रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, मिठाचं जास्त सेवन केल्याने इम्यूनिटीसाठी घातक ठरू शकतं.

Research said high intake salt diet can weaken immune system | आपण रोज खात असलेल्या 'या' पदार्थामुळे कमजोर होते इम्यूनिटी, वेळीच व्हा सावध नाही तर....

आपण रोज खात असलेल्या 'या' पदार्थामुळे कमजोर होते इम्यूनिटी, वेळीच व्हा सावध नाही तर....

googlenewsNext

पदार्थात मीठ कमी असेल तर त्या पदार्थाची चव लागत नाही. म्हणजे मिठाशिवाय जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. मिठाने पदार्थांना चव येत इतकंच नाही तर  त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. मिठाच्या सेवनाने आपल्या शरीरारा आवश्यक सोडिअम आणि क्लोराइड मिनरल मिळतात. सोडिअम आपल्या शरीराची हालचाल आणि क्लोराइड शरीरात द्रव्य पदार्थ संतुलित ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. असं असलं तरी मिठाचं अधिक सेवन केल्याने नुकसानही होतात. एका नव्या रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, मिठाचं जास्त सेवन केल्याने इम्यूनिटीसाठी घातक ठरू शकतं.

काय सांगतो रिसर्च?

सायन् ट्रान्सलेशनल मेडिसिनवर प्रकाशित एका नव्या रिसर्चनुसार, जर्मनीच्या यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ बोनच्या वैज्ञानिकांच्या टीमने एक रिसर्च केला. यात आढळून आलं की, आपल्या आहारातून मिठाचं जास्त सेवन केलं तर याने इम्यून सिस्टीमच्या सेल्सच्या अॅंटी-बॅक्टेरिअल फंक्शन बिघडतं. ज्यामुळे इम्यून सिस्टीम शरीरासाठी घातक बॅक्टेरियाला नष्ट करू शकत नाही. आणि E. Coli. बॅक्टेरियामुळे किडनीला संक्रमणही होऊ शकतं. (हे पण वाचा : झोपण्याआधी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, वजन तर वाढेलच अन् पोटही बाहेर येईल!)

कसा केला रिसर्च?

वैज्ञानिकांच्या एका टीमने उंदरांवर रिसर्च करण्यासाठी लिस्टीरिया बॅक्टेरियाने त्यांना संक्रमित केलं. ज्यानंतर आढळून आले की, ज्या संक्रमित उंदरांना हाय सॉल्ट डाएट म्हणजे जास्त मीठ असलेले पदार्थ देण्यात आले त्यांची स्थिती गंभीर झाली. जास्त मिठाचं सेवन केल्याने न्यूट्रोफिल नावाच्या शरीराची सुरक्षा करणाऱ्या कोशिका कमजोर होतात. ज्या मुख्य रूपाने बॅक्टेरिअल किडनी इन्फेक्शनसोबत लढण्यास मदत करतात.

किती करावं मिठाचं सेवन?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, प्रत्येक वयस्क व्यक्तीने दिवसभरात एक चमचा म्हणजे ५ ग्रॅम मिठाचं वेगवेगळ्या पदार्थातून सेवन करावं. ही एक सरासरी प्रमाण आहे. लहान मुलांमध्ये हे प्रमाण कमी होईल. त्यासोबतच दररोज मिठाचं योग्य प्रमाण तुमच्या शारीरिक हालचालीवरही अवलंबून असतं. हे जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा किंवा डाएटिशिअनचा सल्ला घेऊ शकता.
 

Web Title: Research said high intake salt diet can weaken immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.