'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 03:57 PM2023-01-14T15:57:22+5:302023-01-14T15:57:49+5:30

Cancer : इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ४० वयाआधी वजन वाढल्याने अंतर्गर्भाशय कॅन्सर होण्याचा धोका ७० टक्के, किडनीच्या पेशींचा कॅन्सर होण्याचा धोका ५८ टक्के, कोलोन कॅन्सर होण्याचा धोका २९ टक्क्यांनी वाढतो.

Research says if you are overweight age of 40 then risk cancer will be difficult | 'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

'या' वयाआधीच लठ्ठ झालात तर कॅन्सरपासून तुमची सुटका नाही' - रिसर्च

Next

Cancer : एका नव्या रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, ४० वय होण्याआधी वजन वाढल्याने किंवा लठ्ठपणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा म्हणजेच कर्करोगाचा धोका वाढतो. इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ४० वयाआधी वजन वाढल्याने अंतर्गर्भाशय कॅन्सर होण्याचा धोका ७० टक्के, किडनीच्या पेशींचा कॅन्सर होण्याचा धोका ५८ टक्के, कोलोन कॅन्सर होण्याचा धोका २९ टक्क्यांनी वाढतो.

रिसर्चमध्ये असं आढळलं की, वजन वाढल्याने स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये लठ्ठपणासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढतो. अभ्यासकांनी तीन वर्षांत वेगवेगळ्या वेळात वयस्क लोकांचं दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वजन केलं होतं. यात त्यांना कॅन्सरची शक्यता होण्याआधीही त्यांचं वजन केलं होतं. अभ्यासकांनी कॅन्सरच्या धोक्यासंबंधी चयापचय कारणांची तपासणी करण्यासाठी २००६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'मी कॅन' रिसर्चमधील २२०,००० व्यक्तींच्या आकडेवारीच्या वापर केला.

यात नॉर्वे, स्वीडन आणि ऑस्ट्रियाचे जवळपास ५,८०,००० लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.  रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, २७,८८१ लोक ज्यांना टेस्टदरम्यान कॅन्सर असल्याची माहिती मिळाली, त्यातील ९७६१ म्हणजे साधारण ३५ टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त होते. अभ्यासकांनुसार, सामान्य बीएमआय असलेल्या लोकांच्या तुलनेत पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये ३० पेक्षा अधिक बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित कॅन्सर विकसित होण्याचा धोका सर्वात अधिक होता.

रिसर्चचे सह-लेखक टोने बजॉर्ग म्हणाले की, 'पुरूषांमध्ये हा धोका ६४ टक्के आणि महिलांमध्ये ४८ टक्के आहे. आता आमचा मुख्य उद्देश हा आहे की, वजन वाढणं रोखण्यासाठी आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी एक महत्वपूर्ण रणनीति आणखे'.

Web Title: Research says if you are overweight age of 40 then risk cancer will be difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.