धावण्याची ही वेगळी पद्धत वजन कमी करण्यासाठी ठरते परफेक्ट, कशी ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:07 PM2019-11-19T12:07:57+5:302019-11-19T12:16:06+5:30

वाढलेलं वजन कमी करणं किंवा वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फार चिंतेत दिसतात. कारण बिझी लाइफस्टाईलमधे आपल्या नेहमीच्या सवयी सहजासहजी बदलणे शक्य होत नाही.

Research says run backward instead running forward get these countless benefits | धावण्याची ही वेगळी पद्धत वजन कमी करण्यासाठी ठरते परफेक्ट, कशी ते वाचा!

धावण्याची ही वेगळी पद्धत वजन कमी करण्यासाठी ठरते परफेक्ट, कशी ते वाचा!

googlenewsNext

(Image Credit : executivestyle.com.au)

वाढलेलं वजन कमी करणं किंवा वजन नियंत्रणात ठेवणं याबाबत अलिकडे लोक फार चिंतेत दिसतात. कारण बिझी लाइफस्टाईलमधे आपल्या नेहमीच्या सवयी सहजासहजी बदलणे शक्य होत नाही. काही लोकांचा भर एक्सरसाइजवर वाढला आहे. यात साधारणपणे धावण्याला लोक अधिक महत्व देतात. धावणं म्हटलं की, आपण सरळ समोरच्या दिशेने धावू लागतो. पण तुम्ही कधी उलट्या दिशेने धावले आहात का? नसाल धावले तर आता धावा. कारण एका रिसर्चनुसार, उलटं धावल्याने वजन कमी करण्यास अधिक फायदा होतो. 

(Image Credit : avitahealth.org)

ब्रिटनमधे करण्यात आलेल्या या रिसर्चमधे २६ महिलांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या महिलांना जवळपास ६ आठवडे उलटं धावायला सांगण्यात आलं. यात ज्या महिला दररोज १५ ते ४५ मिनिटे सरळऐवजी उलटं धावत होत्या, त्या महिलांचं वजन २.५ टक्के कमी आढळलं. यूनिर्व्हर्सिटी ऑफ मिलान आणि कराडिफ यूनिव्हर्सिटीच्या काही अभ्यासकांचं मत आहे की, उलटं धावल्याने गुडघ्याची समस्याही दूर होते.

(Image Credit : pyroenergen.com)

१) सरळ धावताना तुम्ही थोडी कंबर वाकवू शकता. याने तुम्हाला मान आणि पाठीचं दुखणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याऐवजी उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त ताठ रहावं लागतं आणि हीच स्थिती धावताना तुम्ही कायम ठेवता. जोर धावणाऱ्यांचा मूड नेहमी चांगला राहतो. असे लोक दिवसभर मेहनत करुनही फ्रेश दिसतात.

२) रिसर्चनुसार, उलटं धावल्याने तुम्ही तुमचं वजन लवकर कमी करु शकता. कारण उलटं धावल्याने तुमच्या २० टक्के कॅलरी जास्त बर्न होतात. धावणं ही सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. याने हृदयरोगांचाही धोका टाळता येऊ शकतो, असं वेगवेगळ्या शोधात सांगण्यात आलं आहे. तणावपूर्ण वातावरणात काम केल्यानंतर थोडं धावायला गेलात तुम्हाला फ्रेश वाटेल. 

३) उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते, म्हणून याने तुमच्या शरीराची क्षमताही वाढते. त्यासोबच सरळ धावल्याने तुमच्या मेंदूचं लक्ष आजूबाजूला जाऊ शकतं. पण उलटं धावत असल्याने तुमचा मेंदू त्यातच गुंतलेला असतो. त्यामुळे तुमची एकाग्रताही वाढते. 

४) मेडिसन अ‍ॅंड सायन्स इन स्पोर्ट्स अ‍ॅंड एक्सरसाइजच्या एका रिपोर्टमध्ये, दररोज जॉगिंग करणाऱ्या १ लाख लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जे दररोज २६.६ किमी चालतात, त्यांना आर्थरायटीसचा धोका कमी होतो. 

ब्रिटनमध्ये उलट्या दिशेने धावण्याची स्पर्धा आयोजित करणारे जेम्स बाम्बर सांगतात की, अशाप्रकारे धावण्याचे अनेक फायदे आहेत. उलटं धावण्यासाठी तुम्ही पायाच्या दुसऱ्या टोकावर जास्त भार दिला जातो. त्यामुळे तळपाय आणखी मजबूत होतात. तसेच शरीराची बांधाही सरळ होतो. बाम्बर यांच्यानुसार, उलटं धावणाऱ्यांना एका निर्धारित अंतरापर्यंत धावल्यावर जो फायदा होतो, तो सामान्यपणे धावणाऱ्यांच्या कितीतरी जास्त असतो. 


Web Title: Research says run backward instead running forward get these countless benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.