आता शरीराबाहेरच तयार होणार किडनी, ट्रान्सप्लांटसाठी नाही बघावी लागणार वाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:15 PM2019-02-08T12:15:54+5:302019-02-08T12:16:29+5:30

जर तुमची किडनी खराब झाली असेल तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटसाठी अनेक वर्ष डोनरची वाट बघत बसावी लागते.

Researcher can make kidney for kidney disease patients for kidney transplant | आता शरीराबाहेरच तयार होणार किडनी, ट्रान्सप्लांटसाठी नाही बघावी लागणार वाट!

आता शरीराबाहेरच तयार होणार किडनी, ट्रान्सप्लांटसाठी नाही बघावी लागणार वाट!

googlenewsNext

जर तुमची किडनी खराब झाली असेल तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटसाठी अनेक वर्ष डोनरची वाट बघत बसावी लागते. मात्र आता किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. जपानच्या संशोधकांनी काही डोनर स्टेम सेल्सचा वापर करून उंदरांमध्ये किडनीचा विकास केला आणि ही किडनी योग्यप्रकारे कार्य करत आहे. 

संशोधकांना आशा आहे की, अशाप्रकारे मनुष्यासाठीही किडनी तयार करण्यास मदत होईल. जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार, रेनल डिजीजने पीडित रुग्णांवर उपचार करण्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय आहे. 

जपानमध्ये नॅशनल इंन्स्टीट्यूट फॉर फिजिओलॉजिकल सायन्सच्या संशोधकांनुसार, अनेक रुग्ण किडनींची कमी उपलब्धता असल्याने ट्रान्सप्लांट सर्जरी करू शकत नाही. जर अमेरिकेचं सांगायचं तर इथे ९५ हजार रुग्ण किडनी डोनरच्या यादीत आहेत आणि ते त्यांचा नंबर येण्याची वाट बघत आहेत. संशोधक मानवी शरीराच्या बाहेर निरोगी अंग विकसित करण्यावर वेगाने काम करत आहेत. याप्रकारच्या टेक्निकला कोम्प्लेमेंटेशन म्हटले जाते. 

भारतात किडनी ट्रान्सप्लांटची स्थिती

तज्ज्ञांनुसार, किडनीशी संबंधित रुग्णांची संख्या भारतात गेल्या १५ वर्षात दुप्पट झाली आहे आणि वर्तमानात प्रत्येक १०० पैकी १७ लोक किडनीच्या आजाराने पीडित आहेत. जवळपास १५० ते २३० व्यक्ती लाखो लोकांमधून एंड-स्टेज किडनी रोगाने पीडित आहेत. तर जवळपास २,२०००० ते २,७५,००० नवीन रूग्णांना रिप्लेसमेंट थेरपीची गरज असते. 

१.६ लाख रूग्णांना किडनीची गरज

आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात जवळपास १.६ लाख रूग्ण किडनी ट्रान्सप्लांटच्या प्रतिक्षेत आहेत. भारतात केवळ १२ हजार डोनरच उपलब्ध आहेत. दरवर्षी १ ते २ लाख किडनींची गरज असते, ज्याने ५० हजार लोकांमध्ये किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते. 

इंडियन ट्रान्सप्लांट रजिस्ट्रीनुसार, १९७१ आणि २०१५ दरम्यान भारतात २१, ३९५ किडनी ट्रान्सप्लांट केल्या गेल्या. ज्यात केवळ ७८३ किडनी मृत दात्यांची होती. जागरूकता आणि प्रक्रियांची कमतरता तसेच परिवारातील सदस्यांना वाटणारी भीती हे मृत किडनी डोनरची संख्या कमी होण्याचं मुख्य कारण आहे. 

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक किडनी डोनर

मोहन फाऊंडेशननुसार, २०१४ मध्ये किडनी डोनरची जास्तीत जास्त संख्या तामिळनाडूमध्ये २२७ इतकी होती. त्यानंतर केरळमध्ये १०४, महाराष्ट्रात ८९ आणि आंध्रप्रदेशात ९२ किडनी दान करण्यात आल्या.

किडनी रूग्णांसाठी आनंदाची बातमी

आता जपानमधील संशोधकांनी डोनर स्टेम सेल्सच्या माध्यमातून उंदरांमध्ये किडनीचा विकास केला. या प्रयोगानंतर अशी आशा केली जात आहे की, याप्रकारे किडनीचा विकास केला जाऊ शकतो. याने जगभरातील किडनी डोनर कमी असलेल्या संख्येची समस्या दूर होऊ शकते.

किडनी खराब होण्याची कारणे

तज्ज्ञ सांगतात की, किडनी खराब किंवा निकामी होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यात मुख्य म्हणजे लघवी रोखून धरणे, पाणी कमी पिणे, जास्त मिठाचं सेवन, हाय बीपीवर उपचार न करणे, डायबिटीज, जास्त मांसाहार, सतत पेनकिलर घेणे, जास्त मद्यसेवन करणे इत्याही मुख्य कारणे आहेत. 

Web Title: Researcher can make kidney for kidney disease patients for kidney transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.