वैज्ञानिकांचा दावा - नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात 'ही' चूक पडू शकते जीवघेणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:28 AM2023-12-19T09:28:31+5:302023-12-19T09:29:34+5:30
Health Tips : हृदयासंबंधी आजार होण्याची अनेक कारणे आहेत ज्यातील महत्वाचं कारण म्हणजे वेळेवर जेवण न करणे हेही आहे.
Health Tips : वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO) नुसार, जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतात. जगात एकूण मृत्युपैकी 16 टक्के मृत्यू हृदयासंबंधी आजारांच्या कारणाने होतात. हृदयासंबंधी आजार होण्याची अनेक कारणे आहेत ज्यातील महत्वाचं कारण म्हणजे वेळेवर जेवण न करणे हेही आहे.
वेळेवर जेवल्याने हृदयरोगाचा धोका टळतो
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, नाश्ता आणि रात्रीचं जेवण वेळेवर केल्याने हृदयरोग रोखण्यास मदत मिळू शकते. हा रिसर्च नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ज्यात 100,000 पेक्षा अधिक व्यक्तींच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं.
जेवणाला उशीर केला तर वाढतो धोका
रिसर्चमध्ये आढळून आलं की, दिवसाच्या पहिल्या जेवणाला उशीर केल्याने हृदयरोगाचा धोका अधिक वाढतो. तसेच असंही आढळून आलं की, दर तासाच्या उशीराने सेरेब्रोवास्कुलर डिजीजमध्ये सहा टक्के वाढ होऊ शकते.
कोणत्या वेळी जेवायचं?
रिसर्चमध्ये असंही आढळून आलं की, रात्री 9 वाजतानंतर जेवण केल्याने स्ट्रोकचा (transient ischemic attack) येण्याचा धोका 28 टक्के जास्त असतो.
अभ्यासकांनी सांगितलं की, तुम्ही जेवढ्या उशीरा जेवण करता, ते पचायलाही तेवढाच वेळ लागतो आणि जेवण योग्यपणे पचन झालं नाही तर ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर वाढण्याचाही तेवढाच धोका असतो.
सायंकाळी बीपीमुळे हार्ट अटॅकचा धोका
सायंकाळी जेव्हा वाढलेलं ब्लड प्रेशर खाली येतं तेव्हा रक्तवाहिन्यांना गंभीर नुकसान होतं. ज्यात संभावित रूपाने ब्लड क्लॉट, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होऊ शकतो.
नाश्ता उशीरा केला तरी धोका
अभ्यासकांनी सांगितलं की, नाश्त्यात उशीर केल्याने कोरोनरी हृदय रोगाचा धोका 11 टक्के वाढतो. ते असंही म्हणाले की, असं केल्याने सगळ्यात जास्त महिला प्रभावित होतात.