फारच घातक असतो मिनी हार्ट अटॅक, दुसऱ्या आजारासारखी वाटतात याची लक्षण; वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 10:20 AM2023-02-04T10:20:25+5:302023-02-04T10:21:10+5:30
Mini heart attack : मिनी हार्ट अटॅकला मेडिकल भाषेत नॉन-एसी एलिवेशन मायोकार्डियल इंफार्क्शन म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही वेळीच काही केलं नाही तर तुमच्या नसा पूर्णपणे ब्लॉक होऊ शकता.
Mini heart attack : हार्ट अटॅकची लक्षण इतकी गंभीर असतात की, कुणीही ओळखू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये जातात. पण मिनी हार्ट अटॅक थोडा वेगळा असतो. ज्याच्या लक्षणांना लोक पोटातील गॅस किंवा चुकीचं काही खाल्ल्याची समस्या समजतात. पण ही चूक खूप घातक ठरू शकते. इतकंच काय तुमच्या जीवाला धोकाही होऊ शकतो.
मोठ्या हार्ट अटॅकची सुरूवातीची लक्षण
मिनी हार्ट अटॅकला मेडिकल भाषेत नॉन-एसी एलिवेशन मायोकार्डियल इंफार्क्शन म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही वेळीच काही केलं नाही तर तुमच्या नसा पूर्णपणे ब्लॉक होऊ शकता आणि यामुळे मोठा हार्ट अटॅक येऊ शकतो.
एनसीबीआयवर प्रकाशित एका रिसर्चनुसार, मिनी हार्ट अटॅकमुळे होत असलेली वेदना सामान्यपणे 10 मिनिटांपेक्षा जास्त राहते. ही वेदना पुढे हात, मान आणि जबड्यातही होऊ शकते. सोबतच मळमळ होणे, थकवा, घाम येऊ शकतो. पण ही लक्षण फार हलकी असतात. ज्याला लोक सामान्य समजतात.
जर तुम्हाला मिनी हार्ट अटॅकची लक्षण जाणवत असतील तर वेळीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी करा. ईसीजीने हे लगेच स्पष्ट होईल की, तुम्हाला मिनी हार्ट अटॅक आला आहे किंवा नाही. त्यानंतर योग्य ते उपचार घ्या.
हेल्थलाइननुसार, ईसीजीने मिनी हार्ट अटॅक ओळकता येऊ शकतो. यात ST किंवा T-वेब खालच्या बाजूने झुकलेली असते. तेच क्यू वेबमध्ये कोणतंही प्रोग्रेशन नसतं. तर मोठ्या हार्ट अटॅकमध्ये एसी-वेब उंच आणि क्यू वेबमध्ये प्रोग्रेशन असतं.
जर तुम्ही धूम्रपान करत असाल आणि कोणतीही शारीरिक हालचाल करत नसाल, हाय बीपी किंवा कोलेस्ट्रॉल असेल, डायबिटीस असेल, लठ्ठपणा किंवा परिवारात हार्ट अटॅकचा इतिहास असेल, तर तुम्हाला या आजाराचा धोका जास्त राहतो.