निवासी डॉक्टराचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30

Resident doctor's suicide attempt | निवासी डॉक्टराचा आत्महत्येचा प्रयत्न

निवासी डॉक्टराचा आत्महत्येचा प्रयत्न

Next
>मुंबई: केईएम रुग्णालयातील ऑथार्ेपेडिक्स विभागात प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका निवासी डॉक्टरने गेल्या आठवड्यात दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मानसिक ताण असल्यामुळे त्यांनी असा प्रयत्न केला होता. सध्या त्याला घरी पाठवण्यात आले आहे.
केईएम रुग्णालयाताच राहणार्‍या या निवासी डॉक्टरला कामाचा अतिताण होता, फक्त चार तास झोप मिळायची. या या कारणांचा परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर झाला होता. त्यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. पण, जीवनशैली बदल न झाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्यचा प्रयत्न केला. त्याने दोनदा मनगटाच्या शिरा कापून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मानसोपचार तज्ज्ञांकडे त्याचे उपचार सुरु केले आहेत. शारिरीकदृष्ट्या त्याला बरे वाटालया लागल्यावर त्याला घरी पाठवण्यात आले.
त्या मुलाला मानसिक आजार आहे. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याच्या वडीलांना बोलवून त्यांना याबाबत आधी सांगण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Web Title: Resident doctor's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.