वायप्रदुषणामुळे होणारे श्वसन विकार असोत वा अ‍ॅलर्जी; तज्ज्ञच सांगतायत, आयुर्वेद हा रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:30 PM2022-01-03T18:30:08+5:302022-01-03T18:32:55+5:30

काही विशिष्ट औषधी वनस्पतींच्या नियमित वापराने अस्थमा आणि सीओपीडी यासारख्या समस्या तर दूर राहतातच शिवाय आरोग्याचे दीर्घकालीन लाभ देखील अनुभवता येतात.  अशा काही उपयुक्त सामग्रीची माहिती पुढे देत आहे.

respiratory disorder or allergies caused by air pollution Ayurveda is best medicine says expert | वायप्रदुषणामुळे होणारे श्वसन विकार असोत वा अ‍ॅलर्जी; तज्ज्ञच सांगतायत, आयुर्वेद हा रामबाण उपाय

वायप्रदुषणामुळे होणारे श्वसन विकार असोत वा अ‍ॅलर्जी; तज्ज्ञच सांगतायत, आयुर्वेद हा रामबाण उपाय

Next

वायू प्रदूषण आणि अ‍ॅलर्जीवर आयुर्वेदाचे औषधजगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ३७ भारतामध्ये असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष हा आपल्या देशासाठी एक गंभीर इशारा आहे. देशामध्ये श्वसन आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी पावले उचलण्याची खूप मोठी जबाबदारी भारतावर आणि येथील प्रत्येक व्यक्तीवर आहे. 

जग निरोगी राहावे यासाठी आपण प्रत्येकजण खूप काही करू शकतो. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला माझी आयुर्वेदातील प्रॅक्टिस आणि संशोधनाला सुरुवात केल्यापासून मी लोकांना श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. अस्थमा, सीओपीडी यासारख्या अनेक आजारांचे जर निदान करण्यात आले नसेल तर प्रदूषण आणि हवामानाशी संबंधित इतर बाबींमुळे ते अधिक तीव्र होऊन अ‍ॅलर्जिक समस्यांचे कारण बनू शकतात. 

मला असे आढळून आले आहे की, काही विशिष्ट औषधी वनस्पतींच्या नियमित वापराने अस्थमा आणि सीओपीडी यासारख्या समस्या तर दूर राहतातच शिवाय आरोग्याचे दीर्घकालीन लाभ देखील अनुभवता येतात.  अशा काही उपयुक्त सामग्रीची माहिती पुढे देत आहे:

जगभरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक, काळी मिरीमध्ये पिपेरिन हा घटक मोठ्या प्रमाणात असतो, यामध्ये असे अँटीऑक्सिडंट गुण आढळून आले आहेत जे प्रदूषण, सिगरेटचा धूर आणि अशा इतर गोष्टींच्या संपर्कात आल्याने शरीरात निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात.  यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुण देखील असतात, जे फुफ्फुसांमध्ये प्रदूषकांचा शिरकाव झाल्याने येणारी सूज बरी करतात.  काळी मिरीचा वापर जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात रोज होतो.  काळी मिरीच्या नियमित सेवनामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदयाचे संरक्षण होते आणि शरीराची पोषके शोषून घेण्याची क्षमता देखील काळ्या मिरीमुळे वाढते.

  • पिपळी सर्व प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर गुणकारी नैसर्गिक उपाय म्हणून दीर्घकाळापासून ओळखली जाते.  याच्या सेवनाने श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात, सूज कमी होते, श्लेष्मा (म्युकस) दूर होऊन फुफ्फुसे पुन्हा निरोगीपणे कार्य करू लागतात. 
  • वेलची हा स्वयंपाकघरांमध्ये सर्रास वापरला जाणारा अजून एक पदार्थ असून यामध्ये देखील अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, ब्रॉन्कील इंफ्लेमेशन्स आणि इन्फेक्शन्स दूर करण्यात वेलची मदत करते.
  • अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-ट्युमर गुण असतात, त्यामुळे श्वसनाच्या आजारांवरील औषधांमध्ये त्याचा आवर्जून वापर होतो.  रक्ताभिसरण, मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्याशी संबंधित तसेच शरीरातील इतर अनेक समस्यांवर उपाय म्हणून अश्वगंधाचा वापर होतो.  अश्वगंधामुळे पेशी जुन्या होण्याचे प्रमाण रोखले जाते, खरे तर, शरीरातील पेशी जुन्या होणे हेच आरोग्याच्या अनेक समस्यांचे कारण असते.
  • आवळा हा अत्यंत गुणकारी असून याचे उपचारात्मक उपयोग असंख्य आहेत.  श्वसनाच्या आजारांवरील उपचारांमध्ये देखील याचा उपयोग होतो. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते, त्याच्या सेवनाने शरीरातील सूज कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुण देखील असतात. 
  • बहुतांश भारतीय पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर होतो.  जिऱ्यामध्ये लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने जंतू आणि विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गांविरोधात लढताना जिऱ्यामुळे मिळणारे फायदे अतुलनीय आहेत.  याशिवाय शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यात देखील जिरे मदत करते.
  • बेलापासून काढल्या जाणाऱ्या तेलामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, बुरशीविरोधी आणि विषाणूविरोधी गुण असतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य पूर्ववत होण्यात मदत मिळते. 
  • सुंठ हा आणखी एक सर्वसामान्य पदार्थ आहे ज्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.  अस्थमा किंवा सीओपीडीपासून त्रस्त रुग्णांसाठी श्वास अपुरा पडण्याची समस्या कमी करण्यात तसेच ब्रॉंकोडायलेशन (श्वसननलिका रुंदावणे) मध्ये सुंठ उपयोगी ठरू शकते.  

या औषधी वनस्पतींचा समावेश असलेल्या सप्लिमेंट्सचा वापर करणे हे श्वसनाचे आजार दूर ठेवण्याच्या ज्ञात रहस्यांपैकी एक आहे.  संसर्ग आणि त्यामुळे शरीरामध्ये येणारी सूज रोखण्याच्या क्षमता असलेले घटक वापरून तयार करण्यात आलेले आरोग्य सप्लिमेंट वापरून आपण श्वसनाचे आरोग्य उत्तम राखू शकतो.  

असे आढळून आले आहे की, या सप्लिमेंट्सच्या नियमित वापरामुळे अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया ट्रिगर करू शकणाऱ्या अँटीबॉडीज कमी होतात, निरोगी श्वसनाला प्रोत्साहन मिळते व शरीराची रोगप्रतिकारशक्ती पुन्हा प्रदान केली जाते.  या सर्वांच्या बरोबरीने निरोगी जीवनशैली, संतुलित व प्रमाणबद्ध आहार आणि नियमित व्यायाम यांच्या साहाय्याने आरोग्याच्या बहुतांश समस्या दूर ठेवल्या जाऊ शकतात.

-डॉ. जे. हरीन्द्रन नायर 
संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, पंकजाकस्तुरी हर्बल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 

Web Title: respiratory disorder or allergies caused by air pollution Ayurveda is best medicine says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.