बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:21 PM2022-11-16T13:21:21+5:302022-11-16T13:29:20+5:30

काम करताना किंवा खाताना सतत आपले पाय हलत असतात जे आपल्याला कळतही नाही. मग बाजुचे अनेकदा सांगतात अरे का पाय हलवतोय. तर यामागे अनेक कारणं असू शकतात.

restless-legs-syndrome-where-one-moves-legs-continuously-while-sitting-or-working | बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार

बसल्या बसल्या सतत पाय हलवता? मग 'या' गंभीर सिंड्रोमचे तुम्हीही आहात शिकार

googlenewsNext

Restless legs syndrome : बसल्या बसल्या सतत पाय हलवण्याची सवय तुम्हालाही आहे का ? अनेकांना हा प्रश्न ऐकल्यानंतर हे जाणवले असेल की अरे हो आपणही उगाचच सतत पाय हलवत असतो. पण असे का होते याचा विचार केलाय का कधी? काम करताना किंवा खाताना सतत आपले पाय हलत असतात जे आपल्याला कळतही नाही. मग बाजुचे अनेकदा सांगतात अरे का पाय हलवतोय. तर अनेक कारणांमुळे ही सवय असू शकते.

अनेकदा आपण करत असलेल्या कामात लक्ष लागावे म्हणून आपोआप पाय हलतात. कधीकधी झोपून मोबाईल बघताना पाय अनेक जण पाय हलवत असतात. ही सवय म्हणजे एक सामान्य बाब ही असू शकते. मात्र काही वेळेस हे गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते.बघुया या सवयीमागील कारणे काय आहेत आणि ही सवय मोडण्यासाठी काय करता येईल?

बसल्या बसल्या पाय हलवणे कोण्या आजाराचे संकेत ?

काम करताना, बसल्या बसल्या पाय हलवण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक महत्वाचे कारण म्हणजे तुम्हाला रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असण्याची शक्यता आहे. ही एक अशी समस्या आहे जी नर्व्हस सिस्टीमशी जोडलेली असते. सतत डोक्यात सुरु असणारे विचार, चिंता यामुळे आपोआपच आपण अशा पद्धतीने रिअॅक्ट होत असतो. त्यामुळे नेहमीच या सवयीकडे दुर्लक्ष करु नका. 

काही लोकांना बसताना किंवा झोपताना अचानक दुखायला लागते. त्यानंतर पाय हलवल्याने दुखणे कमी व्हायला लागते. जेव्हा हे दुखणे वाढायला लागते तेव्हा तुम्हाला रेस्टलेस सिंड्रोम झाला आहे हे समजुन जा. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते तेव्हा ही समस्या उद्भवते. 

Genetic reason आनुवंशिक कारण 

या सिंड्रोमचे नेमके कारण अजुनही अस्पष्ट आहे. मात्र काही केसेस मध्ये हे आनुवंशिकही असु शकते. आई किंवा वडिलांना ही सवय असेल तर तुम्हालाही तशी सवय लागण्याची शक्यता आहे. अशावेळेस स्वत:च ही सवय मोडण्याचा प्रयत्न करा.

यावर उपाय काय ?

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम दूर करायचा असेल तर muscles stretching मसल्स स्ट्रेचिंग वेळोवेळी करा. यामुळे शरीराचे अवयव रिलॅक्स होतात. ही सवय खुपच गंभीर बनत असेल तर फिजीओथेरपिस्ट कडे जा. त्यांनी सांगितलेले व्यायाम नियमित केल्याने ही सवय मोडता येणे शक्य आहे. 

Web Title: restless-legs-syndrome-where-one-moves-legs-continuously-while-sitting-or-working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.