वजन कमी करण्याचा नवीन फंडा 'रिवर्स डायटिंग'; जाणून घ्या नक्की काय आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:04 PM2019-09-10T12:04:43+5:302019-09-10T12:07:11+5:30
तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय का? किंवा वजन कमी करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करताय का? अनेकदा वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करूनही काहीही फायदा होत नाही.
तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय का? किंवा वजन कमी करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करताय का? अनेकदा वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करूनही काहीही फायदा होत नाही. कारण जर तुमचं वजन कमी करण्याचं मिशन तेव्हाच सफल होइल जेव्हा तुम्ही जेवढ्या कॅलरींच सेवन करता आणि एक्सरसाइज करून जेवढ्या कॅलरी बर्न करता यादोन्ही क्रियांमध्ये एक परफेक्ट बॅलेन्स राखता आलं पाहिजे. असातच जास्तीत जास्त लोकांना असं वाटतं की, वजन कमी करणं म्हणजे कमी खाणं. पण हा अत्यंत चुकीचा समज आहे. अशातच काही अशीही लोक आहेत. जी जास्त खाऊनही बारिकच असतात. अशातच जास्त कॅलरीजचं सेवन करून वेट लॉस करण्याच्या या डाएट ट्रेन्डचं नाव आहे रिवर्स डाएटिंग. सध्या अनेक व्यक्ती हा वेट लॉसचा फंडा ट्राय करताना दिसून येत आहेत. जाणून घेऊया नक्की काय आहे रिवर्स डाएटिंग...?
नक्की काय आहे रिवर्स डाएटिंग?
रिवर्स डायटिंगचा ट्रेंड बॉडी बिल्डर्स आणि अॅथलीट्स यांमध्ये फार पॉप्युलर आहे. यामुळे शरीरामध्ये एनर्जी लेव्हल मेन्टेन ठेवण्यासोबतच बॉडी वेटही मेन्टेन राहतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिवर्स डाएटिंगमार्फत शरीराची एनर्जी लेव्हल उत्तम राहते. भूक कमी लागते आणि वेट लॉस करण्यासही मदत होते. रिवर्स डाएटिंगमध्ये काही आठवड्यांमध्ये तुम्हाला हळूहळू कॅलरी इनटेक वाढवावा लागतो. त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते.
साधारणतः इतर डाएट ट्रेन्ड्समध्ये तुम्हाला वेळेसोबत तुमचं कॅलरी इनटेक हळूहळू कमी करावं लागतं. जेणेकरून तुमचं शरीर हळूहळू त्यासाठी अनुकूल होइल. असं केल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म कमी होतं आणि शरीराची एनर्जी वाचते. परंतु, रिवर्स डाएटिंग अशा अवस्थेत थोडं त्रासदायकही ठरू शकतं. त्यावेळी जेव्हा तुमची वजन कमी केल्याशिवाय आपल्या नॉर्मल डाएटमध्ये परत येण्याची इच्छा असते.
कंस कराल रिवर्स डायटिंग?
रिवर्स डायटिंगमध्ये तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये सामान्य इनपुटमध्ये 50 ते 100 कॅलरीचं जास्त सेवन करावं लागतं. ही प्रोसेस 4 ते 10 आठवड्यांपर्यंत फॉलो करणं आवश्यक असतं. यादरम्यान तुमचं प्रोटीन इनटेक एकसारखचं असावं लागतं. कॅलरी इनटेक वाढवल्यामुळे मेटाबॉलिज्म उत्तम राहतं आणि तुम्ही नॉन एक्सरसाइज अॅक्टिविटी म्हणजेच, बोलणं, चालणं आणि सामान्य काम करत असतातना तुम्ही कॅलरी बर्न करू शकता. त्याचबरोबर लेप्टिन यांसारखे हार्मोन्सचा लेव्हल सामान्य ठेवण्यासाठीही मदत मिळेल. जी भूक आणि बॉडी वेट रेग्युलेट करण्यासाठी परिणामकारक ठरेल.
वेट लॉस करण्यासाठी मददगार ठरते रिवर्स डायटिंग?
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिवर्स डायटिंगमार्फत अनहेल्दी पदार्थ जास्त खाण्याची इच्छा होते ती कमी करण्यासाठी मदत मिळते. अशातच जर आपण डाएटिंग ट्रेन्डच्या थिअरीवर विश्वास करत असू तर हे डाएट वेट लॉससाठी उत्तम आहे. परंतु, प्रॅक्टिकली हे कितपत योग्य आहे. याबाबत आतापर्यंत कोणतीही बाब समोर आलेली नाही. रिवर्स डायटिंगमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि डायटिंगनंतर पुन्हा वजन वाढविण्याचा धोका राहत नाही. त्याचबरोबर एनर्जी लेव्हल वाढते आणि भूक कमी लागते. परंतु या डाएट ट्रेन्डमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते हे ठामपणे सांगणं कठिण आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.)