'या' वयाआधी लहान मुलांना चहा-कॉफी देणं पडू शकतं महागात, गंभीर समस्यांचा करावा लागेल सामना!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:03 AM2020-03-13T11:03:09+5:302020-03-13T11:07:41+5:30
आई-वडील लहान मुलांना नेहमी जंक फूड आणि चहा-कॉफी घेण्यास मनाई करतात. पण लहानग्यांच्या हट्टासमोर आई-वडीलही हार मानतात.
(Image Credit : eater.com)
लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी सगळेच पालक वेगवेगळे प्रयत्न करत असता. त्यांना पौष्टिक पदार्थ दिले जातात आणि नियमित काळजी घेतली जाते. पण जसजसे लहान मुलं मोठे होऊ लागतात त्यांचे नखरे वाढतात आणि ते हेल्दी डाएटऐवजी अशा गोष्टींचं सेवन करू लागतात ज्याने त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. बरीच लहान मुलं कमी वयातच चहा-कॉफीचं सेवन सुरू करतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी फारच नुकसानकारक असतं.
आई-वडील लहान मुलांना नेहमी जंक फूड आणि चहा-कॉफी घेण्यास मनाई करतात. पण लहानग्यांच्या हट्टासमोर आई-वडीलही हार मानतात. हेच पुढे जाऊन लहान मुलांसाठी घातक ठरतं. दुधाच्या तुलनेत चहा आणि कॉफी फार स्ट्रॉंग असते. त्यामुळे लहान मुलांना या दोन्ही पेयांपासून दूरच ठेवा.
का देऊ नये चहा-कॉफी?
कॉफीचं अधिक प्रमाणात सेवन करणं कोणत्याही वयातील व्यक्तींसाठी नुकसानकारकच ठरू शकतं. तज्ज्ञांनुसार, कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफीन हे तत्व असतं. हे तत्व फारच उत्तेजक आहे. जर प्रमाणापेक्षा जास्त हे शरीरात गेलं तर याने वेगवेगळे आजार होऊ शकतात.
(Image Credit : checkupnewsroom.com)
लहान मुलांसाठी हे जास्तच स्ट्रॉंग ठरतं. त्यामुळे त्यांना पोटदुखी, डोकेदुखी, झोप न येणे, हृदयाचे ठोके वाढणे यांसारख्या समस्या होऊ लागतात. याच कारणामुळे लहान मुलांना कॉफी न पिण्याचा सल्ला दिला जातो.
कोणत्या वयात करावं सेवन?
तशी तर कॉफी लहान मुलांना कोणत्याच वयात देणं चांगली नसते. पण डॉक्टरांनुसार, ८ वयानंतर तुम्ही तुमच्या लहान मुलांना एक कप लाइट कॉफी देऊ शकता. पण जर लहान मुलं कॉफी पिण्याचा हट्टच करत नसतील तर त्यांना १६ वयानंतरच कॉफीचं सेवन करू द्या.
एका रिसर्चनुसार, एका वयस्क व्यक्तीने दिवसातून कधीही २ ते ३ कपांपेक्षा जास्त कॉफीचं सेवन करू नये. जर तुम्ही तुमच्या मुलांना कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, फ्लेवर्ड फ्रूट ड्रिंक्ससारखे पेय सेवन करण्यापासून रोखाल तर हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं ठरेल.