उन्हाळ्यात कोणत्या वेळ प्यावं नारळ पाणी? जाणून घ्या त्यानुसार फायदे...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:18 AM2024-04-30T10:18:37+5:302024-04-30T10:18:59+5:30
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्यायला हवं. पण हे पाणी या दिवसात कधी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...
Healthy Drinks: नारळाचं पाणी हे फारच शक्तीशाली मानलं जातं. कारण यातून शरीराला एक नाहीतर अनेक फायदे मिळतात. उन्हाळ्यात हे पाणी म्हणजे वरदानच ठरतं. याने शरीर सुरक्षित आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते. नारळाच्या पाण्यात कॅलरी कमी असतात आणि नॅचरल एंझाइम्सही असतात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्यायला हवं. पण हे पाणी या दिवसात कधी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
मुळात नारळ पाणी पिण्याची अशी कोणती एक वेळ नाहीये. हे पाणी कधीही पिता येऊ शकतं. पण तरीही हे पाणी रिकाम्या पोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी रिकाम्या पोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, एसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.
वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.
दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.
जर रात्री झोपण्याआधी नारळ पाण्याचं सेवन केलं तर याच्या सुगंधाचे साइकोलॉजिकल इफेक्ट्स व्यक्तीवर प्रभाव टाकतो ज्यामुळे चिंता-तणाव कमी होतो. सोबतच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.