वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी कधी प्यावे? जाणून घ्या कशी कमी होते चरबी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:12 AM2024-10-30T10:12:31+5:302024-10-30T10:13:28+5:30
Weight Loss : जिऱ्याच्या पाण्याचं नियमितपणे सेवन केलं तर फॅट बर्न वेगाने होऊ लागतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
Weight Loss : वाढलेलं वजन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना वाटतं की, केवळ जिमला जाऊन आणि आहारात बदल करून वजन कमी करता येतं. मात्र, असेही काही छोटे उपाय असतात जे वजन कमी करण्यास अधिक मदत करतात. असाच एक उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी. जिऱ्याच्या पाण्याचं नियमितपणे सेवन केलं तर फॅट बर्न वेगाने होऊ लागतं आणि वजन नियंत्रणात राहतं. अशात जिऱ्याच्या पाण्याने वजन कसं कमी होतं आणि ते कधी प्यावं हे जाणून घेऊ.
वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी
वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जिऱ्याचं पाणी पिण्याची सगळ्यात बेस्ट आणि प्रभावी वेळ सकाळची आहे. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाकून ठेवा. सकाळी जिऱ्याचं हे पाणी हलकं गरम करा आणि गाळून सेवन करा. जिऱ्याचं पाणी प्यायल्यानंतर एक तास काहीच खाऊ किंवा पिऊ नका. अशाप्रकारे जिऱ्याचं पाणी प्याल तर पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. जिऱ्याचं पाणी पिण्यासोबतच दिवसातून अर्धा तास पायी चालावे. याने जिऱ्याच्या पाण्याच्या प्रभाव वाढतो.
अधिक प्रभावासाठी जिऱ्याचं पाणी सकाळसोबतच रात्री सुद्धा सेवन करू शकता. रात्री एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात टाकून उकडून घ्या. हे पाणी हलकं कोमट असताना सेवन करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जिऱ्याचं पाणी प्यायल्यानंतर एक तास काही खाणं किंवा पिणं टाळावं. रात्री जिऱ्याचं पाणी पिण्याची योग्य वेळ जेवणानंतर असते. जेवण केल्यावर अर्ध्या तासाने जिऱ्याचं पाणी पिऊ शकता.
जिऱ्याच्या पाण्यात फार कमी कॅलरी असतात. तसेच जिऱ्यात अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ए, सी, कॉपर आणि मॅगनिज असतं. सोबतच यातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणामुळे लठ्ठपणा कमी केला जाऊ शकतो. यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि फॅट बर्न वेगाने होतं.