फळं आरोग्यासाठी उत्तम म्हणून कधीही खाऊ नका.. पडेल चांगलेच महागात, जाणून घ्या योग्य वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 02:17 PM2022-10-07T14:17:25+5:302022-10-07T14:18:11+5:30
फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही फळे खायला आवडतात. फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आजारी असताना फक्त फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, ऐरव्हीदेखील फळे किती प्रमाणात आणि कोणत्या वेळी खावीत, याची अचूक माहिती असणेही महत्त्वाचे आहे.
अनेकजण संध्याकाळी फळे न खाण्याचा सल्ला देतात, तर कोणी जेवणानंतर फळे खाऊ नयेत, असे म्हणतात. त्याचबरोबर अशी काही फळे आहेत जी, रिकाम्या पोटी खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया फळे खाण्याची योग्य वेळ कोणती आणि कोणती फळे रिकाम्या पोटी खाणे हानिकारक ठरू शकते.
शरीर सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन आवश्यक आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार दिवसा कधीही फळे खाऊ शकता. फळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्याचे सेवन दिवसभर करता येते. परंतु, कोणताही आजार किंवा उपचार सुरू असताना योग्य वेळेनुसार फळांचे सेवन करावे.
वजन कमी -
फळांमध्ये भरपूर फायबर असते, फळे खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी राखण्यासाठी दुपारी 11 ते 12 या वेळेत फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. 12 वाजता फळे खाल्ल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल, त्यामुळे दुपारच्या जेवणात कमी कॅलरीज खाल्ल्या जाऊ शकतात. याशिवाय फळे गोड असतात, त्यामुळे त्यात कॅलरीज जास्त असतात. जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढू शकतात, त्यामुळे जेवणानंतर फळे न खाण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भधारणेमध्ये फळे खाणे -
गर्भधारणेदरम्यान फळे खाणे खूप महत्त्वाचे आहे. गरोदरपणात फळे कधीही खाऊ शकता, पण जेवण्यापूर्वी फळे खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात न्याहारीनंतर फळांचे सेवन करणे चांगले. गरोदरपणात मधुमेहाचा धोकाही जास्त असतो, त्यामुळे कॅलरीज नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.
ही फळे रिकाम्या पोटी खाऊ नका -
- केळी
- नाशपाती
- संत्रा
- मौसंबी
- आंबा
- द्राक्षे
- लिची