रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:41 PM2024-09-20T12:41:34+5:302024-09-20T12:42:03+5:30

Sleeping and Wake up time : अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ काय असते? असं म्हणतात सूर्य निघण्याआधी व्यक्तीने झोपेतून उठलं पाहिजे. कारण...

Right time to wake up and sleep in daily routine | रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

Sleeping and Wake up time :  रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर झोपेतून उठणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं असं एक्सपर्ट्स नेहमीच सांगत असतात. याचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ काय असते? असं म्हणतात सूर्य निघण्याआधी व्यक्तीने झोपेतून उठलं पाहिजे. कारण सकाळी लवकर उठल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे...

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?

व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे.

रात्री किती वाजता झोपावं?

निरोगी आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी रोज किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. त्यामुळे सकाळी ५ वाजता उठण्यासाठी तुम्हाला रात्री १० वाजता झोपावं लागेल. या रूटीनमुळे तुमचं शरीर निरोगी राहील. सोबतच शरीराची एनर्जी लेव्हलही वाढेल. 

योग्य वेळी न उठण्याचे नुकसान

सकाळी जर तुम्ही उशीरा झोपेतून उठत असाल तर ब्लड शुगर लेव्हल कमी आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. सोबतच सेरोटोनिन हार्मोनही कमी होऊ लागतात. व्हिटॅमिन डी ची कमतरता येऊ शकते, जे आपल्याला सकाळच्या उन्हातून मिळू शकतं. जास्त वेळ झोपल्याने शरीरात आखडलेपणा येतो, थकवा जाणवतो आणि डिप्रेशनचाही धोका राहतो.

Web Title: Right time to wake up and sleep in daily routine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.