तुम्ही अशाप्रकारे झोपता का? जाणून घ्या योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:17 PM2018-05-17T13:17:17+5:302018-05-17T13:17:17+5:30
काहीही झाले नसले तरी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याचं एक कारण म्हणजे झोपण्याची चुकीची पद्धत आहे. चला जाणून घेऊया योग्यप्रकारे झोपण्याची पद्धत...
(Image Credit: Minq.com)
आपण कधी आपल्या झोपण्याच्या पद्धतीवर लक्षच देत नाही. जसे चांगले वाटते तसे आपण झोपतो. पण आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. योग्य पद्धतीने झोपल्यास आराम तर मिळतोच सोबतच मसल्समधील ताण आणि शरीरातील दुखण्यापासून आराम मिळतो. हेल्थ एक्सपर्टनुसार, काहीही झाले नसले तरी अनेकांना अंगदुखीचा त्रास होत असतो. याचं एक कारण म्हणजे झोपण्याची चुकीची पद्धत आहे. चला जाणून घेऊया योग्यप्रकारे झोपण्याची पद्धत...
पोटावर झोपणे : हेल्थ एक्सपर्ट हे नेहमीच पोटावर झोपण्याला सर्वात धोकादायक असल्याचं सांगितात. पोटावर झोपल्याने मानेला त्रास होतो. अशाप्रकारे झोपल्यास पाय आणि हात सुन्न होतात. सोबतच नसांनाही याने त्रास होतो.
एका कडावर झोपणे : जर तुम्ही झोपताना घोरत असाल तर एका कडावर झोपल्यास फायदा होईल. पण केवळ एकाच कडावर झोपणे योग्य नसल्याचं सांगितलं जातं. थोड्या थोड्या वेळाने झोपण्याची बाजू बदलत राहा. नाहीतर अंगदुखी होऊ शकते.
पाठिवर झोपणे : झोपण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे पाठिवर झोपणे आहे. अशाप्रकारे झोपल्या खांदेदुखी आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो. पण जर तुम्हाला घोरण्याती सवय असेल तर पाठिवर झोपणे त्रासदायक ठरु शकतं. असे झोपल्यास तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
हातांना डोक्याखाली घेऊन : काही लोकांना हात-पाय पसरुन झोपण्याची सवय असते. पण हातांना डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय असते जी फार चुकीची आहे. याने हातांच्या नसा दबण्याची भीती असते.