जास्त फायद्यासाठी केसांवर अशा पद्धतीने लावा मेहंदी, केस होतील मजबूत, काळे अन् चमकदार....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 12:58 PM2024-06-04T12:58:45+5:302024-06-04T12:59:04+5:30

Hair Care Tips : आज आम्ही तुम्हाला केसांना मेहंदी लावताना काय काळजी घेतली पाहिजे आणि मेहंदी लावण्याची पद्धत सांगणार आहोत.

Right way to applying heena or mehendi on hair for more benefits | जास्त फायद्यासाठी केसांवर अशा पद्धतीने लावा मेहंदी, केस होतील मजबूत, काळे अन् चमकदार....

जास्त फायद्यासाठी केसांवर अशा पद्धतीने लावा मेहंदी, केस होतील मजबूत, काळे अन् चमकदार....

Hair Care Tips : केस चांगले ठेवण्यासाठी महिला असो वा पुरूष केसांना मेहंदी लावतात. यामुळे केस मजबूत, लांब आणि काळे राहतात. तसे तर मेहंदी केसांवर लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण बरेच लोक केसांना मेहंदी लावताना बऱ्याचदा चुका करतात. ज्यामुळे मेहंदीचे फायदे केसांना पूर्णपणे मिळू शकत नाहीत. अशात आज आम्ही तुम्हाला केसांना मेहंदी लावताना काय काळजी घेतली पाहिजे आणि मेहंदी लावण्याची पद्धत सांगणार आहोत.

केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत

- मेहंदी त्यादिवशी किंवा एक दिवसआधी केस शाम्पूने चांगले धुवून घ्याल. याने केसांमधील धूळ, माती निघून जाईल आणि मेहंदीचा प्रभाव चांगला होईल. तसेच मेहंदी लावणार त्यादिवशी केसांना तेल लावू नका.

- केसांना नेहमीच ऑर्गेनिक मेहंदी लावावी. ऑर्गेनिक मेहंदीने केस खराब होत नाहीत. मेहंदी तशी तर तुम्ही केसांना कशीही लावू शकता. पण त्याचे फायदे वाढवण्यासाठी त्यात काही गोष्टींचा वापर केला पाहिजे. 

- मेहंदीमध्ये एक चमचा हळद, मोहरीचं तेल, मेथी पावडर आणि पाणी टाकून केसांवर लावा. याने केस वाढण्यास मदत मिळते. तसेच केसगळतीची समस्याही दूर होते. त्याशिवाय मेहंदीमध्ये चहा पावडर मिक्स केली तर केस काळेही होतात.

- बरेच लोक मेहंदी केसांवर 2 ते 3 तासांसाठी लावून ठेवतात. पण असं करणं चुकीचं आहे. केसांना जास्त वेळ मेहंदी लावून ठेवाल तर केस जास्त ड्राय किंवा रखरखीत होतात.

- केसांवर लावल्यावर मेहंदीचा प्रभाव वाढवण्यासाठी डोक्यावर शॉवर कॅप लावून ठेवा. त्याशिवाय केसांवर प्लास्टिक रॅप किंवा एखादी पॉलिथिन लावू शकता.

- केसांवर कंडीशनरसारखी मेहंदी लावण्यासाठी मेहंदीमध्ये पाणी टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण 10 मिनिटे केसांवर लावून ठेवा आणि केस धुवून घ्या. केसांची वाढ यामुळे चांगली होईल.

- ऑयली किंवा नॉर्मल केसांवर मेहंदी लावण्यासाठी मेहंदीमध्ये तुम्ही एलोवेरा जेल टाकू शकता. हे मिश्रण केसांवर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. यामुळे केस लांब, दाट आणि मुलायम होतील.

Web Title: Right way to applying heena or mehendi on hair for more benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.