ऋजुता दिवेकर यांनी सांगितली केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत, सगळ्याच समस्या होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:54 PM2024-05-27T15:54:10+5:302024-05-27T15:55:10+5:30
Right way to do Hair massage : तुम्हाला आठवत असेल की, जुन्या काळात कोणतेही उत्पादने न वापरता केस लांब, मुलायम आणि चमकदार राहत होते. त्याचं कारण होतं केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत जी आज अनेकांना माहीत नसते.
Right way to do Hair massage : सगळ्यांनाच वाटत असतं की, त्यांचे केस लांब, चमकदार आणि मुलायम असावेत. तसेच त्यांना केसगळतीची समस्या होऊ नये. पण वेगवेगळ्या कारणांमुळे आजकाल कमी वयातच केस गळायला सुरूवात होते. इतकंच नाही तर केसांचा चमकदारपणा जातो आणि केस रखरखीत होतात. अशात महिला आणि पुरूष केस चांगले करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्स असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. पण तुम्हाला आठवत असेल की, जुन्या काळात कोणतेही उत्पादने न वापरता केस लांब, मुलायम आणि चमकदार राहत होते. त्याचं कारण होतं केसांची मालिश करण्याची योग्य पद्धत जी आज अनेकांना माहीत नसते.
आजकाल जास्तीत जास्त लोकांना केसगळीतीची समस्या भेडसावते. त्यात महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश आहे. हेच काय तर कमी वयातही केस पांढरे होतात आणि केसगळती होऊ लागते. त्यामुळे लगेच टक्कल पडतं. केसासंबंधी या समस्या दूर कशा करता येतील याचा सल्ला डायटिशिअन ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत केसांची तेलाने मालिश करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.
त्यांची केसांना तेलाने मालिश करण्याची ही पद्धत तुम्ही फॉलो केली तर केसगळती, पांढरे केस अशा समस्या लगेच दूर होण्यास मदत मिळेल. केसांना तेलाने मालिश करण्याची ही योग्य पद्धत अनेकांना माहीत नसते. तिच आज जाणून घेऊ.
हाताने मसाज
ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आधी हातांवर थोडं तेल घ्या आणि ते डोक्याच्या मधोमध टाका. त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा. याने तेल केसांच्या मुळापर्यंत जाईल आणि केसांना पोषण मिळेल. तसेच तुम्हाला याने आरामही मिळेल.
टॅप करा
हातांवर थोडं तेल घेऊन ते डोक्याच्या मधोमध टाकल्यावर हाताने काही सेकंद टॅप करा. याने तेल सगळीकडे पसरेल आणि तुमचं डोकं दुखणंही थांबेल.
बोटांनी करा मसाज
डोक्याच्या मधोमध तेल टाकल्यावर बोटांच्या मदतीने डोक्यावर सगळेकडे हलक्या हाताने मसाज करा. याने केस डोक्याच्या त्वचेत आतपर्यंत जाईल आणि केसांना पोषण मिळेल.