फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका कापलेला कांदा, एक्सपर्टने सांगितल्या स्टोर करण्याच्या खास पद्धती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 01:31 PM2024-04-18T13:31:04+5:302024-04-18T13:31:29+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात एक्सपर्टने कांदे स्टोर करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.
Store Onion : कांदा तर सगळेच रोज वेगवेगळ्या पदार्थातून खातात. कधी वेगवेगळ्या भाज्यांमधून तर कधी कच्चाही खाल्ला जातो. लोक कांदा वेगवेगळ्या पद्धतीने स्टोर करतात. कुणी टोपलीत ठेवतात तर कुणी इतर भाज्यांसोबत फ्रीजमध्ये ठेवतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात एक्सपर्टने कांदे स्टोर करण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.
कांदे स्टोर करण्याची योग्य पद्धत
एक्सपर्टनुसार कांदे 45 ते 50 डिग्री फारेनहाइटवर स्टोर करावं. कांदे कधीही बॅगमध्ये ठेवू नये. कारण त्यांना श्वास घेण्यासाठी हवेची गरज असते. तसेच बटाटे आणि कांदेही सोबत एकत्र ठेवू नये. कारण यामुळे कांदे खराब होऊ शकतात.
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कांदे 40-50°F (4-10°C) तापमानावर स्टोर करणं सगळ्यात चांगलं असतं. या तापमानात कांदे आपले गुण कायम ठेवतात. कमी तापमानात कांदे ठेवले तर त्यांना कोंब फुटू शकतात.
कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवू नये
- अनेकदा सलाद किंवा भाज्यामध्ये टाकल्यानंतर थोडा कापलेला कांदा शिल्लक राहतो. बरेच लोक हा कांदा फ्रीजमध्ये ठेवतात. असं अजिबात करू नये. कारण याने कांद्याचा ओलावा शोषला जातो. तसेच त्यात बॅक्टेरिया आणि फंगसही वाढू लागतात.
- फ्रीजमध्ये थंड आणि ह्यूमिड वातावरण असतं. जे रसदार आणि पालेभाज्यांमध्ये ओलावा कायम ठेवतं. पण थंड तापमानात कांदा चांगला राहू शकत नाही आणि तो स्टार्चला शुगरमध्ये बदलणं सुरू करतो. जर तापमान किंवा ह्यूमिडिटी फार जास्त असेल तर कांद्याला अंकुरही फुटतात किंवा ते सडू लागतात.
- कांदे कधीही प्लास्टिकच्या बॅगमध्ये किंवा पिवशीत बांधून ठेवू नये. अशात कांद्यांना हवा न लागल्याने कांदे खराब होता किंवा ते सडतात. त्यासोबतच त्यातील पोषक तत्वही कमी होतात.