लठ्ठपणामुळे अनेक पटीने वाढतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:09 AM2019-09-17T10:09:22+5:302019-09-17T10:13:51+5:30

जर तुम्ही वेळीच लठ्ठपणा आणि लाइफस्टाईलकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं.

Risk of developing type 2 diabetes increases 6 times due to obesity | लठ्ठपणामुळे अनेक पटीने वाढतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध नाही तर...

लठ्ठपणामुळे अनेक पटीने वाढतो 'या' गंभीर आजाराचा धोका, वेळीच व्हा सावध नाही तर...

Next

(Image Credit : nypost.com)

लठ्ठपणामुळे टाइप-२ डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका अनेक पटीने वाढतो. लठ्ठपणा व्यतिरिक्त जेनेटिक कारण आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळेही टाइप-२ डायबिटीसचा धोका वाढतो. ही माहिती नुकत्याच एका रिसर्चमधून समोर आली. हा रिसर्च स्पेनच्या बार्सिलोनामध्ये आयोजित युरोपियन असोसिएशन ऑफ द डायबिटीसच्या वार्षिक बैठकीत सादर करण्यात आला. युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगनच्या नोवो नॉर्डिक फाउंडेशन सेंटर फॉर बेसिक मेटाबॉलिज्म रिसर्च योकोपोविच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला होता.

खराब लाइफस्टाईल, लठ्ठपणा आणि आनुवांशिकता टाइप-२ डायबिटीसच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. जगभरात हा आजार वेगाने पसरत आहे. एका आकडेवारीनुसार, एकट्या भारतात साधारण १० लाख लोक हे टाइप-२ डायबिटीसचे शिकार आहेत. सध्या भारतात डायबिटीसने पीडित २५ पेक्षा कमी वयाच्या प्रत्येकी ४ लोकांपैकी एकाला टाइप-२ डायबिटीस आहे.

(Image Credit : healthline.com)

इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशननुसार, २०१७ मध्ये जवळपास ४२५ मिलियन वयस्कांना ही समस्या होती. ही आकडेवारी २०४५ पर्यंत वाढून ६०० मिलियनपेक्षा अधिक होण्याचा धोका आहे.

टाइप-२ डायबिटीसला रोखण्यासाठी सध्याची रणनीति म्हणजे शरीराचं वजन सामान्य ठेवणे आणि हेल्दी लाइफस्टाईलवर फोकस ठेवणे ही आहे. डायबिटीसच्या रूग्णांना सर्वात जास्त धोका वजन वाढल्याने होतो. जर तुम्हाला डायबिटीस नसेल आणि पोटाच्या आजूबाजूला, पार्श्वभागावर आणि मांड्यांवर चरबी असेल तर तुम्ही शुगर पेशन्ट होण्याचा धोका अधिक वाढतो. 

(Image Credit : insider.com)

टाइप-२ डायबिटीसचा धोका वाढवण्याला लाइफस्टाईल, लठ्ठपणा आणि आनुवांशिकता ही मुख्य कारणे असतात. त्यामुळे तुम्हाला या आजारापासून बचाव करायचा असेल तर हेल्दी पदार्थ खावे आणि वजन नियंत्रित ठेवण्यावर लक्ष द्यावं. रोज एक्सरसाइज आणि ब्रिस्क वॉक करा.

Web Title: Risk of developing type 2 diabetes increases 6 times due to obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.