कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:02 PM2020-05-01T13:02:21+5:302020-05-01T14:44:01+5:30

गरमीच्या वातावरणात व्हायरल इन्फेंक्शनशी संबंधीत आजार पसरायला सुरूवात होते.  

The risk of disease summer season, know about the preventions myb | कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

कोरोनाच नाही इतरही आजारांना निमंत्रण देऊ शकतो उन्हाळा; 'या' उपायांनी तब्येत सांभाळा

Next

(image credit- buzz feed news)

उन्हाळा सुरू झाल्यामुळे दिवसेंदिवस वातावरणात गरमीचं प्रमाण वाढत चाललं आहे. वाढत्या तापमानात त्वचेसह शरीराची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण घरी बसले आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की बाहेर गेल्यानंतरच फक्त उन्हाचा त्रास होतो. पण असं नाही घरच्याघरी सुद्धा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तुम्ही आजरांना बळी पडू शकता. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणं गरजेंचं आहे. अन्यथा आजारांचा सामना करावा लागू शकतो.

गरमीच्या वातावरणात व्हायरल इन्फेंक्शनशी संबंधीत आजार पसरायला सुरूवात होते.  उन्हाळ्यात अनेकदा टायफाईडची  साथ पसरते. साधारण ताप समजून या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ऊलट्या, जुलाब, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं हा त्रास होऊ शकतो.  

डायरिया म्हणजेच पोटावर सूज येणे, पोट दुखणे, सतत टॉयलेटला जावं लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराचे परीणाम अनेकदा गंभीर बघायला मिळतात. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगलं ठरेल.

 गरमीमुळे डोकेदुखी आणि मायग्रेन समस्या अधिक भेडसावू शकते. गरमीमुळे रक्तनलिका आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदुला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. यात डोकेदुखी  समोरच्या बाजूने सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत जाते. जास्त वेळ उन्हात घालवल्याने ही समस्या अधिक जाणवते.

उन्हाळ्यात कांजण्यांचं संक्रमण वेगाने पसरतं.  लहान मुलांना हा आजार जास्त  होताना दिसून येतो. या आजारात संपूर्ण शरीरावर लाल डाग येतात तसंच तीव्र ताप येतो. हा आजार पसरू नये या साठी लसीकरण करणं आवश्यक असतं.  (हे पण वाचा-CoronaVirus News : शरीरातील रक्त गोठण्याचं कारण ठरत आहे कोरोना, 'या' औषधांनी होऊ शकतो बचाव)

उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळे शरीर डायड्रेट राहील.  रोज जवळपास ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचं आहे. शक्यतो कोमट किंवा गरम पाणी प्या. आहारात अंडी, दूध, हिरव्या भाज्यांचा समावेश करा. 

जर तुम्हाला घामोळ्या झाल्या असतील तर तुळशीची पानं वाटून त्या भागाला लावल्यास आराम मिळेल. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने चेहरा धुतल्यास फ्रेश वाटेल. 

आहारात द्रव पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा. म्हणजेच ताक, भाज्यांचे सूप, टॉमोटो सूप असे पदार्थ आहारात घ्या. रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. शक्य असल्यास रात्री  हळदीच्या दूधाचे सेवन करून झोपा.

तेलकट, तिखट पदार्थाचा समावेश करू नका.  शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रात्रभर धन्याचे पाणी भिजवून सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करा. ( हे पण वाचा-छातीत दुखणं ठरू शकतं जीवघेणं, एंजायनामुळे येणारा हार्ट अटॅक टाळण्याासाठी वापरा 'हे' उपाय)

Web Title: The risk of disease summer season, know about the preventions myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.