४० व्या वयानंतर वडील होणं ठरु शकतं रिस्की, कसं जे जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:02 AM2019-04-19T11:02:59+5:302019-04-19T11:05:26+5:30
महिलांमध्ये मेनोपॉजचं एक वय असतं, पण पुरुष आयुष्यभर बाळांना जन्म देऊ शकतात.
(Image Credit : www.spectrumnews.org)
महिलांमध्ये मेनोपॉजचं एक वय असतं, पण पुरुष आयुष्यभर मुलांना जन्म देऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे की, जास्तीत जास्त पुरुष उशीर वडील होण्यातही काही गैर समजत नाहीत. तुम्हाला ७० वयातही वडील झालेल्या पुरुषांची उदाहरणे बघायला मिळतात. पण आजकालच्या लाइफस्टाइलमध्ये ३५ वयानंतर वडील होण्यास अडचणी येऊ लागतात.
जर तुम्ही ३५ किंवा ४० वयात वडील झालात, पण याचे साइड इफेक्ट बाळामध्ये बघायला मिळू शकतात. याची वेगवेगळी कारणे आहेत. महिलांना जेवढ्या एग्सची गरज असते ते त्यांच्या सोबतच तयार होतात, तर पुरुषांमध्ये स्पर्मची निर्मिती होत राहते.
वॉशिंग्टनच्या एका यूनिव्हर्सिटीनुसार, प्रत्येकवेळी हृदय धडधडण्यासोबत पुरुष १००० स्पर्मची निर्मिती करतो, पण सर्व स्पर्म एग फर्टिलाइज करुन बाळाचा जन्म देण्याच्या कामात येत नाहीत. हे इजॅक्यूलेशनच्या माध्यमातून बाहेर पडतात किंवा काही वेळेनुसार आपोआप नष्ट होतात. तेच वय वाढण्यासोबतच तुमच्या स्पर्मच्या क्वॉलिटीवर वाईट प्रभाव पडतो.
काय असतो धोका?
- ४० ते ५० वयात तुम्ही तेवढेच स्पर्म निर्मित करु शकता जेवढे २५ ते ३० वयात करता. पण वाढत्या वयासोबत स्पर्मची क्षमता खराब होते.
- वाढत्या वयासोबत स्पर्मचा आकार आणि त्यांची मोबिलिटी घटते. त्यामुळे फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये अडचण येते.
- ४० व्या वयात येतायेता टेस्टोस्टेरॉन लेव्हल घटू लागते. याने कामेच्छा कमी होते.
- इतकेच नाही तर वाढत्या वयासोबत स्पर्म म्यूटेशनमुळे होणाऱ्या बाळामध्ये अनेकप्रकारचे जेनेटिक प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. जर तुमचं वय ४० पेक्षा जास्त असेल तर बाळांमध्ये डाऊन सिंड्रोम, ऑटिजम, टाइप १ डायबिटीज आणि स्किट्सफ्रीनियासारख्या समस्या होऊ शकतात.