शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका, भारतात २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 10:30 AM2019-03-05T10:30:30+5:302019-03-05T10:31:50+5:30
शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे.
(Image Credit : NewsClick)
अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. सोबतच या धुरामुळे लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या संबंधित आजारांचा धोकाही अनेक पटीने वाढला आहे.
५ वर्षांपेक्षा लहान लहान मुलांना ARI चा धोका
रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर आणि याने होणाऱ्या प्रदूषणाने प्रभावित क्षेत्रात राहणारे लोक खासकरून ५ वर्षाखालील लहान मुलं-मुलींमध्ये या धुरामुळे एक्यूट रेस्पिरेट्री इन्फेक्शन(ARI) चा धोका अधिक वाढला आहे. हा रिसर्च यासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतात शेतातील कचरा जाळल्यावर आरोग्याला होणाऱ्या नुकसानाबाबत पहिल्यांदाच अशाप्रकारची माहिती समोर आली आहे.
कसा केला रिसर्च?
अभ्यासकांनी दावा केला आहे की, शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे साधारण २१ हजार कोटी रूपये नुकसानाच्या जाळ्यात पंजाब, हरयाणा आणि दिल्ली आहे. शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक वयोगटातील साधारण २ लाख ५० हजार लोकांच्या आरोग्यासंबंधी डेटा आणि नासाच्या सॅटेलाइटच्या माध्यमातून शेतात लावण्यात आलेल्या आगीच्या घटनांचे फोटो या आधारावर हा रिसर्च करण्यात आला.
आणि रूग्णांची संख्या वाढू लागते
या रिसर्चमध्ये हे सांगण्यात आले आहे की, जेव्हा हरयाणा पंजाबमध्ये शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यास सुरूवात होते, रुग्णालयात ARI ची लक्षणे असलेल्या रूग्णांची संख्या वाढू लागते. तसेच या रिपोर्टमध्ये फटाके, गाड्या इत्यादींपासून होणाऱ्या प्रदूषणाचेही देखील उल्लेख करण्यात आला आहे. रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, हिवाळ्यात शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यामुळे काही दिवस दिल्लीमध्ये Pm म्हणजेच पर्टिक्यूलेट मॅटरचा स्तर WHO च्या मानकांपेक्षा २० टक्के अधिक वाढतो.
यावर उपाय काय?
क्रॉप बर्निंग म्हणजेच शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्याच्या प्रक्रियेला पर्याय शोधण्यासाठी उपाय तर आहेत. पण त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, शेतातील धान्याच्या रोपांचे खुंट जाळणे बंद केले तर याने केवळ पैशांचीच बचत होईल असे नाही तर उत्तर भारतात अकाली मृत्यू आणि अपंगता यांची आकडेवारीही कमी करता येईल.