जास्त वजनामुळे वाढू शकतो अग्नाशयाच्या कॅन्सरचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 10:32 AM2019-04-02T10:32:17+5:302019-04-02T10:32:48+5:30
वजन वाढण्याची समस्या अलिकडे फार जास्त लोकांना भेडसावत आहे. बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यांमुळे वजन वाढण्याची समस्या होत आहे.
वजन वाढण्याची समस्या अलिकडे फार जास्त लोकांना भेडसावत आहे. बदलती लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यांमुळे वजन वाढण्याची समस्या होत आहे. इतकेच नाही तर वजन वाढण्याला आणखीही वेगवेगळी कारणे आहेत. वजन वाढणं म्हणजे अर्थातच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण हे ठरलेलंच. यात काही गंभीर आजारांचाही समावेश आहे. एका रिसर्चनुसार, पन्नास वयाच्या आधीच जर एखाद्या व्यक्तीचं जास्त वजन वाढलं तर त्याचा अग्नाशयाच्या कॅन्सरने मृत्यू होण्याचा धोका अधिक वाढतो.
अभ्यासकांनी सांगितले की, अग्नाशयाच्या कॅन्सरची प्रकरणे तुलनात्मक रूपाने समोर कमीच येतात. कॅन्सरच्या सर्वच नव्या प्रकरणांपैकी साधारण ३ टक्के केसेस अग्नाशयाच्या कॅन्सरच्या असतात. मात्र, हे फारच जीवघेणं असतं. यातून गेल्या ५ वर्षात जिवंत राहणाऱ्यांचा दर केवळ ८.५ टक्के होता.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीमध्ये एपिडेमियोलॉजी रिसर्चचे वरिष्ठ वैज्ञानिक निर्देशक एरिक जे जॅकब्स म्हणाले की, 'वर्ष २००० नंतरपासून अग्नाशयाच्या कॅन्सर होण्याचे केसेसमध्ये हळूहळू वाढ होत आहे. यामुळे आम्ही चिंतेत आहोत. कारण अग्नाशयाचा कॅन्सर होण्याचं एक मोठं कारण असलेलं धुम्रपान आता कमी होत आहे'.
रिसर्च टीमने अमेरिकेतील ९६३, ३१७ अशा वयस्कांच्या डेटाचं परीक्षण केलं, ज्यांचा कॅन्सरचा काही इतिहास नव्हता. या सर्वच लोकांनी रिसर्चच्या सुरुवातीलाच त्यांचं वजन आणि उंची सांगितली. त्यावेळी यातील काही लोक ३० वयाचे होते तर काही लोक ७० व ८० वयाचे होते.
अभ्यासकांनी जास्त वजनाच्या आधारावर बॉडी मास इंडेक्स(बीएमआय)ची मोजणी केली. नंतर या रिसर्चमध्ये सहभागी लोकांपैकी ८, ३५४ लोकांचा अग्नाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाला. मात्र हा धोक्याची वाढ त्या लोकांमध्ये अधिक बघायला मिळाली ज्यांच्या बीएमआयचं आकलन कमी वयात केलं गेलं होतं. जॅकब्स म्हणाले की, या रिसर्च निष्कर्ष याकडे इशारा करतात की, जास्त वजनामुळे अग्नाशयाच्या कॅन्सरच्या जाळ्यात अडकण्याचा धोका अनेक पटीने वाढला आहे.