Rose Day : जोडीदाराला गुलाबाचे फूल देण्यासोबतच गुलाबाचे फायदेही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:57 PM2019-02-07T12:57:09+5:302019-02-07T13:01:42+5:30
'व्हॅलेंटाइन वीक'ला आजपासून सुरुवात झाली असून या वीकचा पहिला दिवस 'रोज डे' म्हणून साजरा करण्यात येतो आणि शेवटचा दिवस 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात.
'व्हॅलेंटाइन वीक'ला आजपासून सुरुवात झाली असून या वीकचा पहिला दिवस 'रोज डे' म्हणून साजरा करण्यात येतो आणि शेवटचा दिवस 14 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाइन डे'पर्यंत वेगवेगळे डे साजरे केले जातात. तुम्हीही या प्रेमाच्या रंगामध्ये रंगून जाऊन आपल्या जोडीदाराला खूश करण्याच्या विचारात असाल तर आजपासूनच सुरुवात करा. रोज डेच्या निमित्ताने एक गुलाबाचं फूल देवून तुम्ही आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का? मनातील भावना व्यक्त करण्यासाठी देण्यात येणाऱ्या गुलाबाचे अनेक फायदे आहेत. हे सुंगधी असण्यासोबतच आरोगयासाठीही अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळे आज तुमच्या पार्टनरला गुलाब देणार असाल तर त्याचे फायदे जाणून घ्या...
गुलाबाचे काही फायदे...
- कानामध्ये वेदाना होत असतील तर गुलाबाच्या पानांच्या रसाचे काही थेंब कानामध्ये टाकल्यामुळे सर्व समस्या दूर होतात.
- चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या उद्भवल्यास गुलाबाच्या फुलांचा वापर करून ही समस्या दूर करण्यासाठी मदत होते. तसचे त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही गुलाबाच्या फुलाचा उपयोग होतो.
- स्किन इन्फेक्शनवर गुलाब पाणी आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करून लावल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
- अस्वस्थ वाटणं, घशात होणारी जळजळ यांसारख्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी एक कप गुलाबपाणी आणि पाव कप संत्र्याचा रस एकत्र करून दिवसातून 2 वेळा प्या. त्यामुळे सर्व समस्या दूर होण्सा मदत होते.
- शरीराच्या एखाद्या भागात जळजळ होत असेल किंवा हाता-पायांना जळजळ होत असेल तर गुलाब पाण्यामध्ये चंदन एकत्र करून हा लेप लावल्याने आराम मिळतो.
- गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार करण्यात येतो. जेवल्यानंतर एक चमचा गुलकंद खाल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
- तोंडाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या, लवंग आणि साखर गुलाब पाण्यामध्ये वाटून त्याच्या छोट्या गोळ्या तयार करा. या गोळ्या खाल्याने तोडांला येणारी दुर्गंधी दूर होते.
- डोकेदुखीचा त्रास होत असेल तर चंदनाच्या पेस्टमध्ये कापूर आणि गुलाब पाणी एकत्र करून डोक्यावर लावल्याने डोकेदुखी दूर होण्यासाठी मदत होते.
- अनेकदा ओठांची त्वचा काळपट दिसू लागते आणि ओठांचा गुलाबी रंग नाहीसा होतो. हा रंग परत मिळवण्यासाठीही गुलाब मदत करतं. त्यासाठी गुलाब पाण्यासोबत ग्लिसरीन एकत्र करून दिवसबरात ओठांवर 5 ते 6 वेळा लावा.
- अनेकदा जास्त काम केल्यामुळे किंवा दिवसभर बाहेर असल्यामुळे डोळे दुखू लागतात. अशावेळी गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यांमध्ये टाकल्याने डोळ्यांना थंडावा लाभतो.