गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:28 PM2020-02-06T16:28:57+5:302020-02-06T16:29:52+5:30

गुलाबाचे फुलं असे आहे की जे तुमचा मुड फ्रेश  करण्यासाठी तसंच त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरत असतो.

Rose Tea is best way of instant weight loss. | गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!

गुलाबाच्या चहाने झटपट वजन करा कमी, ना डाएटची कटकट ना व्यायामाची झंझट!

googlenewsNext

गुलाबाचं फुलं असे आहे की जे तुमचा मुड फ्रेश  करण्यासाठी तसंच त्वचेची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. गुलाबाच्या पाकळ्या आणि त्यांच्या वापराबाबत माहीत नसलेल्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपलं वजनसुद्धा  कमी करू शकता. गुलाबपाणी आणि गुलाबाच्या फुलाचा अर्क यांचा  वापर ब्युटी प्रोडक्समध्ये केला जातो.  गुलाबाचा वापर कशा पध्दतीने केल्यास अंगावरची अतिरिक्त चरबी कमी होईल जाणून घ्या.  त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च सुद्धा करावा लागणार नाही. कमीतकमी पैशात गुलाबाचा चहा तयार करून तुम्ही आपलं वजन कमी करू शकता. 


गुलाबाचा चहा असा करा तयार

गुलाबाचा चहा बनवण्यासाठी ताज्या गुलाबांच्या फुलांचा वापर करा. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला. नंतर १ ते २ कप पाणी फुलांमध्ये घालून  हे पाणी उकळू द्या . नंतर कमी आचेवर हे पाणी राहू द्या.  चहा चांगला तयार झाला आहे असं तुम्हाला वाटल्यानंतर गॅस बंद करा. गॅस बंद कराल तेव्हा पाण्याचा रंग बदललेला असावा.  त्यानंतर पाणी परत उकळवा. मग  हे पाणी गाळून घ्या. नंतर या पाण्यात लिंबू आणि मध घाला. मग या चहाचे सेवन करा. दिवसातून २ ते ३ वेळा तुम्ही या चहाचे सेवन कराल तर  फरक दिसून येईल.


गुलाबाच्या चहाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी

गुलाबाच्या चहाचे सेवन नियमीत  केल्यास वजन कमी होण्याची प्रकिया जलद गतीने होईल.  कारण गुलाबात असलेले पोषक घटक शरीरातील मासं कमी करण्याासाठी फायदेशीर ठरत असतात. तसंच त्वचेच्या रंगात बदल झालेला  दिसून येईल.  या चहात मोठ्या प्रमाणावर  एंटी-ऑक्सीडेंट्स  असतात. ताण-तणावमुक्त राहण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरत असतो. 

पचनक्रिया  व्यवस्थित राहते

पचनक्रिया सुरळित होते. पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर तुम्ही गुलाबाच्या चहाचे सेवन केल्यानंतर फ्रेश फील कराल. गुलाबाच्या चहाच्या सेवनाने  पोटाचे विकार दूर होतात. मळमळ होणे, सतत ढेकर येणे अशा समस्या तसंच  डोकेदुखीचा त्रास कमी होतो. ( हे पण वाचा-विश्वासही बसणार नाही असे विचित्र आजार, कुणाची होते आग लावण्याची इच्छा तर कुणी करतं एकतर्फी प्रेम!)

टॉक्सीन्स बाहेर पडतात.

Image result for toxins in human body

गुलाबाच्या चहाच्या  सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी ,युनिनरी ट्रॅकच्या इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी शरीराला मदत होते.  एंटी-ऑक्सीडेंट आणि  एंटी-इंफ्लेमेटरी गुण शरीरातील टॉक्सीन्स काढून टाकून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात.  रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  गुलाबाचा चहा फायदेशीर ठरतो.  तसंच गुलाबाच्या सुगंधामुळे झोप चांगली येते. ( हे पण वाचा-'या' एका व्हायरसमुळे होऊ शकता सहा प्रकारच्या कॅन्सरचे शिकार, जाणून घ्या कसा पसरतो!)

Web Title: Rose Tea is best way of instant weight loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.