चपाती अशाप्रकारे पाचवत असाल तर होऊ शकतो कॅन्सरचा धोका? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:29 AM2023-04-01T09:29:56+5:302023-04-01T09:31:58+5:30
Roti Cooking Causes Cancer : नुकताच चपाती पाचवण्यावरून एक रिसर्च समोर आला आहे. जो वाचून सगळेच हैराण होतील.
Roti Cooking Causes Cancer : भारतात जेवणसाठी चपाती तयार करणं एक रूटीन काम आहे. पण सगळ्यांच्याच घरात चपाती बनवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते. काही लोक ताव्यावर अर्धी चपाती पाचवल्यानंतर चिमट्याच्या मदतीने थेट गॅसच्या आसेवर ती पाचवतात. तर काही लोक ताव्यावर दोन्हीकडून चपाती पाचवली जाते. लोक मानतात की, अशा दोन्हीप्रकारे चपाती पाचवली तर टेस्ट बदलते. नुकताच चपाती पाचवण्यावरून एक रिसर्च समोर आला आहे. जो वाचून सगळेच हैराण होतील.
रिसर्चमधून धक्कादायक सत्य समोर
एनवायरनमेंट सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, कुकटॉप आणि एलपीजी गॅस स्टोवरमधून नायट्रोजन डायआक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे खतरनाक वायु प्रदुषणाचं उत्सर्जन होतं. WHO ने सुद्धा हे फार घातक मानलं आहे. याने श्वासासंबंधी आजारासोबतच कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. ज्यामुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
न्यूट्रिशन अॅन्ड कॅन्सर जर्नलमध्ये प्रकाशित एका दुसऱ्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, जर आपण जास्त तापमानावर चपाती पाचवली तर त्याने कार्सिनोजेनिक्स तयार होऊ शकतं. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. अशात दम्याच्या रूग्णांनी मोठी अडचण होऊ शकते. तसेच सामान्य लोकांना श्वासासंबंधी आजार सुरू होण्याचा धोका वाढतो.
ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक डॉ पॉल ब्रेंट यांच्यानुसार, जेव्हा गॅसच्या आसेवर चपाती शेकली जाते तेव्हा एक्रिलामाइड नावाचं रसायन तयार होतं. तसेच गॅस आसेवर थेट चपाती पाचवल्याने कार्सिनोजेन्स तयार होतं, जे मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं. आता रिसर्चमध्ये करण्यात आलेले दावे किती खरे आहेत, हे तर सांगता येणार नाही, पण यात सांगण्यात आलेल्या गोष्टींमुळे लोकांनी जरा काळजी घेतलेली बरी.